03 April 2020

News Flash

दोन दिवसांत ५.६१ लाख कोटींचा फटका

जागतिक प्रमुख निर्देशांक घसरणीलाही येथील गुंतवणूकदारांनी साथ दिली.

(संग्रहित छायाचित्र)

प्रमुख निर्देशांकांची २०१९ मधील सर्वात मोठी सत्र आपटी; सेन्सेक्स, निफ्टी २ टक्क्य़ांनी खाली

भांडवली बाजाराशी संबंधित अर्थसंकल्पीय तरतुदी स्पष्ट होत असतानाच त्याचे धक्के प्रमुख निर्देशांकांना मोठय़ा प्रमाणात जाणवू लागले आहेत. अर्थसंकल्पानंतर सलग दुसऱ्या व्यवहारात घसरण कायम राखताना सप्ताहारंभी त्याचे प्रमाण अधिकच विस्तारले. जागतिक प्रमुख निर्देशांक घसरणीलाही येथील गुंतवणूकदारांनी साथ दिली.

व्यवहारात ९०० अंशपर्यंत घसरण नोंदविणारा मुंबई निर्देशांक सोमवारअखेर, शुक्रवारच्या तुलनेत ७९२.८२ अंशांनी खाली येत ३८,७२०.५७ वर येऊन ठेपला. तर २५२.५५ अंश घसरणीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आठवडय़ाच्या पहिल्याच व्यवहारात ११,५५८.६० वर स्थिरावला.

गेल्या आठवडय़ाची अखेर करताना केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवशी सेन्सेक्स जवळपास ४०० अंशांनी आपटला होता. यावेळी मुंबई बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य ३.३९ लाख कोटी रुपयांनी रोडावले होते. तर दोन दिवसांच्या सलग घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे ५.६१ लाख कोटींनी नुकसान झाले आहे.

भांडवली बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांमधील सार्वजनिक भागभांडवल ३५ टक्क्य़ांपर्यंत कमी करण्याच्या अर्थसंकल्पातील तरतुदींचे सलग दुसऱ्या दिवशी पडसाद उमटले. समभाग पुनर्खरेदी, तसेच लाभांशावर दुहेरी अंक प्रमाणात कर लागण्याची धास्ती बाजारात गुंतवणूकदारांमार्फत व्यवहार करताना उमटली.

बाजारातील वाहन, तेल व वायू, वित्त क्षेत्रातील समभाग विक्रीचा अधिक जोर राहिला. कमी मागणीमुळे कंपन्यांना उत्पादन कपात करावी लागत असल्याची चिंता वाहन क्षेत्रातील समभागांच्या मूल्यावर दबाव निर्माण करणारी ठरली. परिणामी या क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग मूल्य मोठय़ा फरकाने खाली आले.

सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्स हा सर्वाधिक तब्बल ८ टक्क्य़ांपर्यंत आपटला. त्याचबरोबर ओएनजीसी, एचडीएफसी, स्टेट बँक, अ‍ॅक्सिस बँक, लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रिज आदीही घसरणीच्या यादीत राहिले. तर टीसीएस, एचसीएल टेक, येस बँक मात्र एकूण मोठय़ा निर्देशांक आपटीतही वाढ नोंदविणारे ठरले.

सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ तीनच समभाग तेजीच्या यादीत राहिले. तर मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक जवळपास अडिच टक्क्य़ांपर्यंत घसरले. आशियाई बाजारात घसरणीचेच चित्र होते.

वाढती रोजगाराची आकडेवारी तसेच व्याजदर कपात टळण्याच्या अंदाजाने अमेरिकी बाजारपेठेतही वाढ होती.

चालू, २०१९ मधील सर्वात मोठी सत्रआपटी सोमवारी २ टक्के निर्देशांक घसरणीच्या रूपात नोंदली गेली. परिणामी मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची मालमत्ताही गेल्या दोन व्यवहारात मिळून ५ लाख कोटी रुपयांनी रोडावली. सेन्सेक्सने ३९ हजाराचा स्तरही सोमवारच्या घसरणीमुळे सोडला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2019 6:10 am

Web Title: sensex nifty down 2 abn 97
Next Stories
1 दोन दिवसात शेअर बाजारात गुंतवणुकदारांना 5 लाख कोटींचे नुकसान
2 शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्समध्ये 665 अंकांची घसरण
3 Union Budget 2019 : सरीवर सरी…
Just Now!
X