News Flash

सेन्सेक्स, निफ्टीची सलग दुसरी घसरण

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४७१.०१ अंश वाढीने ४८,६९०.८० वर स्थिरावला.

अन्नधान्याच्या वाढत्या किमतीची भांडवली बाजारात चिंता

मुंबई : भांडवली बाजारातील निर्देशांक घसरण सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. जागतिक बाजारातील निराशाजनक वातावरणाचा विपरीत परिणाम येथील गुंतवणूकदारांवरही झाला. त्याचबरोबर वाढत्या करोना साथ प्रसार आणि टाळेबंदी निर्बंधामुळे खाद्यान्नाच्या किमती वाढण्याचीही भीती बाजारातील व्यवहारादरम्यान व्यक्त झाली.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४७१.०१ अंश वाढीने ४८,६९०.८० वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५४.२५ अंश वाढीमुळे १४,६९६.५० पर्यंत पोहोचला.

तिसऱ्या सत्राचे व्यवहार संपुष्टात आल्यानंतर प्रत्यक्षात जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, एप्रिलमधील किरकोळ महागाईचा दर मात्र ५ टक्क्यांखाली स्थिरावल्याचे स्पष्ट झाले. तर मार्चमधील देशाचा औद्योगिक उत्पादन निर्देशांकही २२ टक्क्यांपुढे झेपावल्याचे पुढे आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 12:49 am

Web Title: sensex nifty falls for the second time in a row akp 94
Next Stories
1 स्टेट बँकेचे नायर प्रस्तावित ‘बॅड बँके’च्या प्रमुखपदी
2 ‘हॉलमार्किंग’बाबत सराफांना दिलासा
3 अर्थचक्राच्या गतीला बाधा
Just Now!
X