28 January 2020

News Flash

सेन्सेक्स, निफ्टीचा विक्रम

शुक्रवारच्या तुलनेत मुंबई निर्देशांक सोमवारअखेर २५९.९७ अंश वाढ नोंदवित प्रथमच ४१,८५९.६९ वर पोहोचला.

कंपन्यांच्या तिमाही निकालाचे भांडवली बाजारात दमदार स्वागत 

मुंबई : चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीतील कंपन्यांच्या वित्तीय निष्कर्षांचे भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांनी सप्ताहारंभीच जोरदार स्वागत केले. परिणामी सेन्सेक्स व निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी सोमवारी विक्रमी बरोबरी साधली. जागतिक स्तरावरील स्थिरतेने दोन्ही निर्देशांक एकाच व्यवहारात अर्ध्या टक्क्य़ांहून अधिक प्रमाणात झेपावले.

शुक्रवारच्या तुलनेत मुंबई निर्देशांक सोमवारअखेर २५९.९७ अंश वाढ नोंदवित प्रथमच ४१,८५९.६९ वर पोहोचला. तर ७२.७५ अंश वाढीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक दिवससमाप्तीला १२,३२९.५५ पर्यंत स्थिरावला. सत्रातील ३०० अंशपर्यंतच्या उसळीने सेन्सेक्स व्यवहारात ४१,९०० च्या उंबरठय़ावर होता.

निफ्टीने सत्रात १२,३३७.७५ पर्यंत झेपावला होता. बाजारात इन्फोसिसने नोंदविलेल्या दुहेरी अंकातील नफावृद्धीचे तसेच माहिती तंत्रज्ञान कंपनीने आगामी प्रवासाबद्दल व्यक्त केलेल्या आश्वासकतेबद्दल सकारात्मक पडसाद उमटले. शुक्रवारीच जाहीर झालेल्या नोव्हेंबरमधील किरकोळ वाढीच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाबद्दल सावध प्रतिक्रिया बाजारात उमटली.

मुंबई निर्देशांकातील इन्फोसिस ४.७६ टक्के वाढीसह प्रमुख निर्देशांकात तेजीसह अव्वल राहिला. त्याचबरोबर इंडसइंड बँक, भारती एअरटेल, हिंदुस्थान यूनिलिव्हर, महिंद्र अँड महिंद्र, टाटा स्टील, पॉवरग्रिड, टेक महिंद्र आदी ३.३४ टक्क्य़ांनी वाढले. तर टीसीएस, स्टेट बँक, बजाज ऑटो, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रिज, अ‍ॅक्सिस बँक, नेस्ले इंडिया आदी समभाग एक टक्क्य़ापर्यंत घसरले.

मुंबई शेअर बाजारातील सर्वच क्षेत्रीय निर्देशांक वाढले. त्यातही स्थावर मालमत्ता, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, पोलाद, ऊर्जा निर्देशांकांची वाढ अधिक राहिली. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक एक टक्क्य़ापर्यंत वाढले. त्यात अनुक्रमे ०.८१ व ०.९३ टक्के वाढ झाली. दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपयाने गेल्या पाच व्यवहारात १०६ पैशांनी वाढ नोंदविली आहे.

रुपयातील तेजी कायम

मुंबई : परकीय चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य सलग पाचव्या व्यवहारात भक्कम राहिले. सप्ताहारंभीच स्थानिक चलन ८ पैशांनी उंचावत ७०.८६ वर स्थिरावले.

First Published on January 14, 2020 1:36 am

Web Title: sensex nifty record akp 94
Next Stories
1 ‘कोचर यांच्याकडून बोनसची रक्कम वसूल करण्याचे आदेश द्या’
2 रिझर्व्ह बँकेकडे केंद्र सरकार मागणार ४५ हजार कोटी
3 औद्योगिक उत्पादन दरात नोव्हेंबरमध्ये वाढ
Just Now!
X