News Flash

तेजीला खंड

सेन्सेक्स, निफ्टीत किरकोळ घसरण

(संग्रहित छायाचित्र)

सलग सहा व्यवहारांतील तेजीसह, नव्या विक्रमी उच्चांकांवर स्वार झालेल्या सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांना मंगळवारी अखेर घसरण पाहावी लागली. व्यवहाराच्या अंतिम टप्प्यात समभाग विक्रीचा दबाव वाढल्याने दोन्ही निर्देशांक किरकोळ घसरणीने बंद झाले.

गेल्या आठवडय़ात केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यापासून भांडवली बाजारात निर्देशांकात भरधाव तेजी सलग सहा सत्रांत दिसून आली आहे. सेन्सेक्स तसेच निफ्टी या काळात जवळपास ११ टक्क्यांनी वाढले आहेत. मंगळवारच्या सत्रातही तोच क्रम कायम ठेवत, सेन्सेक्सने ५१,८३५.८६ अशा अभूतपूर्व पातळीपर्यंत मजल मारली होती. मात्र दिवसाच्या उत्तरार्धात समभाग विक्रीमुळे दिवसअखेर निर्देशांक घसरणीने झाली. गुंतवणूकदारांच्या नफावसुलीचा वाहन, माहिती तंत्रज्ञान समभागांवर दबाव राहिला.

सेन्सेक्स सोमवारच्या तुलनेत १९.६९ अंश घसरणीसह ५१,३२९.०८ वर स्थिरावला. तर निफ्टी ६.५० अंश घसरणीने १५,१०९.३० पर्यंत खाली आला. सत्रात तो १५,२५७.१० अंशांवर होता.

सेन्सेक्समध्ये महिंद्र अँड महिंद्र सर्वाधिक, ४ टक्क्यांसह घसरला. तसेच बजाज फायनान्स, आयटीसी, सन फार्मा, बजाज ऑटो, बजाज फिनसव्‍‌र्ह, टीसीएस आदींचे मूल्यही कमी झाले. तर एशियन पेंट्स, ओएनजीसी, अ‍ॅक्सिस बँक ३.७० टक्क्यांपर्यंत वाढले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाहन, स्थावर मालमत्ता, पोलाद, आरोग्यनिगा, माहिती तंत्रज्ञान निर्देशांक घसरणीच्या यादीत स्थिरावले. तर दूरसंचार, भांडवली वस्तू, वित्त, बँक निर्देशांक काही प्रमाणात वाढले. मिड व स्मॉल कॅप पाव टक्क्यापर्यंत वाढले.

अर्थसंकल्पाचे भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांनी सलग तेजीसह गेले आठवडाभर स्वागत कायम ठेवले आहे. खासगीकरणाला वाव, उद्यमशीलतेला प्रोत्साहन असे पैलू भावल्यामुळे बाजाराचे प्रमुख निर्देशांक ११ टक्क्यांनी वाढले आहेत. यापूर्वी बाजार अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया म्हणून काही तासांसाठीच तेजी नोंदवताना दिसले आहेत. मात्र सलग सहा दिवसांची दीर्घ वाढ राखत बाजाराने अर्थसंकल्पाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

– निर्मला सीतारामन, अर्थमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 12:11 am

Web Title: sensex nifty slightly lower abn 97
Next Stories
1 सप्ताहातील चार दिवस कामाचे; तर सुटीचे तीन दिवस
2 तेजी सलग सहाव्या सत्रात
3 ७०० कोटी रुपयांचा बोनस… ‘या’ भारतीय कंपनीच्या कर्मचाऱ्यांची मार्चमध्येच दिवाळी
Just Now!
X