06 July 2020

News Flash

सुरळीत अर्थव्यवस्थेचे स्वागत

सेन्सेक्स, निफ्टीत सप्ताहारंभीच ८७९ ची भर अंशवाढीमुळे मुंबई निर्देशांक ३३,३०० पुढे

संग्रहित छायाचित्र

देशातील व्यवहार पूर्वपदावर आणू पाहणाऱ्या टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यातील सरकारच्या घोषणेचे गुंतवणूकदारांनी सप्ताहारंभीच जोरदार स्वागत के ले. आठवडय़ाच्या पहिल्याच व्यवहारात भांडवली बाजाराचे दोन्ही प्रमुख निर्देशांक प्रत्येकी २.५० टक्क्यांहून अधिक प्रमाणात वाढले.

जागतिक भांडवली बाजारातील तेजीनेही गुंतवणूकदारांना येथे समभाग खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित के ले. भारतात कं टेनमेंट क्षेत्र वगळता इतरत्र सोमवारपासून व्यवहार पूर्वपदावर आणण्यास परवानगी दिली आहे.

सोमवारच्या सत्रात १,२५० अंश झेप घेणारा मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स व्यवहारअखेर शुक्रवारच्या तुलनेत ८७९.४२ अंश वाढीने ३३,३०३.५२ वर पोहोचला, तर २४५.८५ अंशवाढीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९,८२६.१५ पर्यंत स्थिरावला.

सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्स ११ टक्क्यांसह तेजीच्या क्रमवारीत अव्वल ठरला. त्याचबरोबर टायटन कं पनी, टाटा स्टील, स्टेट बँक, एचडीएफसी लिमिटेड, इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रिजही वाढले. तर सन फार्मा, नेस्ले इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट मात्र घसरले.

मुंबई शेअर बाजारातील सर्व क्षेत्रीय निर्देशांक तेजीच्या यादीत राहिले. त्यातही वाहन, स्थावर मालमत्ता निर्देशांकांमध्ये वाढ नोंदली गेली. मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक वाढले.

दरम्यान, मुंबई शेअर बाजाराच्या मंचावर सोने व चांदीचे व्यवहार सोमवारपासून सुरू झाले.

एसआयपी संस्थगितीची सुविधा

करोना-टाळेबंदीमुळे उत्पन्न अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर म्युच्युअल फं ड गुंतवणुकीवर विपरीत परिणाम नोंदला जात असतानाच एसआयपी काही कालावधीसाठी संस्थगित करण्याची सुविधा मुंबई शेअर बाजाराच्या मंचावर सुरू करण्यात आली आहे. देशातील सर्वात जुन्या भांडवली बाजारात बीएसई स्टार म्युच्युअल फंड या मंचावर म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात.

फंड गुंतवणूकदारांच्या एसआयपी या मंचावर तिच्या फंड उद्योग घराणी सदस्यांना संस्थगित करता येतील, असे स्पष्ट करण्यात आले.  सध्या ही सुविधा निप्पॉन इंडिया, एल अ‍ॅण्ड टी, एडेलविस, बीओआय अक्सा, एस्सेल, डीएसपी, आदित्य बिर्ला सन लाइफ, एचडीएफसी व महिंद्र म्युच्युअल फंड यांच्या एसआयपी योजनांना लागू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 4:05 am

Web Title: sensex nifty surged by 879 during the week abn 97
Next Stories
1 पाच लाख नव्या वाहनांची भर टळली
2 सहकारी बँकांमध्ये संताप!
3 रिझव्‍‌र्ह बँकेची रोखे विक्री बंद
Just Now!
X