News Flash

निर्देशांक सहा महिन्यांच्या उच्चांकावर

एप्रिल महिन्यातील सौदापूर्तीच्या अखेरच्या दिवशी प्रमुख निर्देशांकाने १% हून अधिक कमाई करत आपली वाटचाल सुरु ठेवली. सेन्सेक्सने २१८.३१ अंशांची कमाई करत १९,४०६.८५ वर स्थिरावतानाच गेल्या

| April 26, 2013 12:10 pm

एप्रिल महिन्यातील सौदापूर्तीच्या अखेरच्या दिवशी प्रमुख निर्देशांकाने १% हून अधिक कमाई करत आपली वाटचाल सुरु ठेवली. सेन्सेक्सने २१८.३१ अंशांची कमाई करत १९,४०६.८५ वर स्थिरावतानाच गेल्या सहा आठवडय़ातील उच्चांकी टप्पा गाठला. तर ७६.३ अंशांची भर टाकणारा निफ्टी ६ हजारानजीक, ५९१३.२० पर्यंत जाऊन पोहोचला.
यंदा वाढीव व्याजदर कपात नक्की, या आशेवर सुरू असलेला भांडवली बाजाराचा तेजीचा प्रवास सेन्सेक्सला दिवसभरात १९४३४.८५ पर्यंत घेऊन गेला. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी व्याजदराशी निगडित समभागांची खरेदी केल्याने मुंबई निर्देशांक १५ मार्च रोजीच्या १९४२७.५६ टप्प्यानजीक पोहोचला.
भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे २०१३-१४ चे पतधोरण बरोब्बर आठवडय़ाने, ३ मे रोजी जाहीर होत आहे.
गेल्या चारही सत्रात सेन्सेक्सने तेजीचा कल राखला आहे. या दरम्यान अंशांमध्ये तब्बल ६७५ अंशांची वाढ नोंदली गेली आहे. गुरुवारी वाहने, औषधनिर्माण या क्षेत्रातील समभागांनी या कमाईला हातभार लावला. हे दोन्ही निर्देशांक अनुक्रमे २.८% व १.९६% होते. तर आघाडीच्या समभागांमध्ये एचडीएफसी, रिलायन्स आदी सहभागी होते. सेन्सेक्समधील २२ समभागांचे मूल्य उंचावले होते.
आशियाई बाजारातील तेजीही कायम आहे. तर युरोपीय भांडवली बाजारांमध्ये गुरुवारी संमिश्र वातावरण पहायला मिळाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2013 12:10 pm

Web Title: sensex on the top in six months
Next Stories
1 ‘एलआयसी’ची नफा वसुली कायम; चार महिन्यांत ९ हजार कोटींचा लाभ
2 वित्तीय तूट आटोक्यात येईल, राजकीय इच्छाशक्ती हवी
3 ‘इतिहाद’ला २४ टक्के हिस्सा विकण्याला ‘जेट’च्या संचालक मंडळाची मंजुरी
Just Now!
X