05 April 2020

News Flash

अस्थिरतेतून सावरत ‘सेन्सेक्स’ची सकारात्मक अखेर

सायंकाळी जाहीर होणाऱ्या औद्योगिक उत्पादन आणि महागाई दराच्या प्रतिक्षेत दिवसभर अस्थिर राहिलेला प्रमुख भांडवली बाजार बुधवारअखेर काहीसा सावरला.

| March 13, 2014 04:48 am

सायंकाळी जाहीर होणाऱ्या औद्योगिक उत्पादन आणि महागाई दराच्या प्रतिक्षेत दिवसभर अस्थिर राहिलेला प्रमुख भांडवली बाजार बुधवारअखेर काहीसा सावरला. २९.८० अंश वाढीसह सेन्सेक्स २१,८५६.२२ वर बंद झाला. निफ्टी ५ टक्के वधारणेसह ६,५१६.९० वर पोहोचला. जानेवारीतील औद्योगिक उत्पादन दराचे वधारलेले व फेब्रुवारीतील किरकोळ महागाईचे घसरणारे आकडे सायंकाळी जाहिर झाले. तत्पूर्वी मुंबई शेअर बाजारात दिवसभर अस्थिरतेची नोंद करणारा सेन्सेक्स सत्रअखेर औषधनिर्मिती, ग्राहकपयोगी वस्तू क्षेत्रातील समभागांच्या मागणीने वधारला. सेन्सेक्सने दोन दिवसांच्या उच्चांकासह सलग पाच सत्रातील वाढ बुधवारी किरकोळ घसरणीसह मोडून काढली होती. दरम्यान, परकी चलन व्यवहारात सलग दुसऱ्या दिवशी भारतीय चनल नरम बनताना २८ पैशांनी घसरत ६१.२२ पर्यंत घसरले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2014 4:48 am

Web Title: sensex positive end
Next Stories
1 बडय़ा १० सरकारी कंपन्यांच्या समभागांची मालकी अवघ्या पाच हजारांत!
2 ‘लोहा इस्पात’कडून २१० कोटींची भागविक्री; बोलीसाठी किंमतपट्टा ७७ ते ८० दरम्यान
3 ‘आयआयएफएल होम बाँड्स’ची विक्री आजपासून; सहा वर्षांत मुद्दल दुप्पट!
Just Now!
X