26 January 2021

News Flash

‘सेन्सेक्स’मध्ये २२२ अंशांची उभारी

प्रारंभिक अनिश्चित कल झटकून टाकत, दिवसअखेर सेन्सेक्स २२२.८० अंशांच्या उसळीसह ३०,६०२.६१ अंशांवर स्थिरावला

संग्रहित छायाचित्र

दोन सत्रातील घसरणीला रोखत गुरुवारी भांडवली बाजारात निर्देशांकांनी पुन्हा उभारी दाखविली. तथापि करोनाग्रस्त आव्हानात्मक आर्थिक परिस्थितीत तिमाही निकाल जाहीर करणाऱ्या विप्रोसह माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना बसलेला फटका मात्र सेन्सेक्सच्या उभारीत मात्र काहीसा अडसर निर्माण करणारा ठरला.

प्रारंभिक अनिश्चित कल झटकून टाकत, दिवसअखेर सेन्सेक्स २२२.८० अंशांच्या उसळीसह ३०,६०२.६१ अंशांवर स्थिरावला, त्याचप्रमाणे निफ्टी निर्देशांकांने ६७.५० अंशांची कमाई करीत गुरुवारचे व्यवहार ८,९९२.८० या पातळीवर आटोपते घेतले. सेन्सेक्समधील सामील ३० समभागांमध्ये एनटीपीसी सर्वाधिक ५.८४ टक्के वाढीसह अग्रणी, तर आयसीआयसीआय बँक (४.५२ टक्के), टायटन (३.८७ टक्के), लार्सन अँड टुब्रो (३.६५ टक्के), स्टेट बँक (३.४६ टक्के) आणि सन फार्मा (३.३७ टक्के) असे वाढ नोंदविणारे समभाग ठरले.

रुपयाचा सार्वकालिक ७६.८७ नीचांक

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय मूल्याने गुरुवारी  ७६.८७ असा सार्वकालिक नीचांक स्तर गुरुवारी गाठला. गुरुवारच्या व्यवहारात रूपयाचे मूल्य प्रति डॉलर ४३ पैशांनी गडगडले. मार्चमधील निर्यातीत ३५ टक्क्य़ांची विक्रमी घसरणीची आकडेवारीचे नकारात्मक प्रतिबिंब चलन बाजारातील पडल्याचा हा परिणाम असल्याचे जाणकार सांगतात. अन्य जागतिक चलनांच्या तुलनेत डॉलरच्या मजबुतीचाही रुपयाच्या मूल्यावर ताण दिसून आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 12:21 am

Web Title: sensex rise of 222 points abn 97
Next Stories
1 ‘सर्वच विक्रेत्यांना घरपोच वस्तू पोहचविण्याची मुभा मिळावी’
2 ‘ते’ सध्या काय करतात.? : चाय पे ‘झूम’चर्चा
3 महागाईचा तळचौकार!
Just Now!
X