30 October 2020

News Flash

अर्थव्यवस्थेची कोंडीतून आंशिक मुक्तता

निर्देशांकात सलग तिसरी वाढ

संग्रहित छायाचित्र

निर्देशांकात सलग तिसरी वाढ

मुंबई : देशव्यापी करोना-टाळेबंदीतून अर्थचक्राची हळूहळू मुक्तता सुरू होत असून, सोमवारपासून देशांतर्गत हवाई प्रवास तसेच रेल्वे प्रवासासाठी आरक्षणही खुले करण्याच्या निर्णयाचे गुरुवारी भांडवली बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आले. त्याची परिणती म्हणून प्रमुख निर्देशांक सलग तिसऱ्या दिवशी वाढले.

अर्थव्यवस्थेची कोंडीतून मुक्ततेची चाहूल मिळाल्याने, ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रातील कंपन्या, वाहन कंपन्या तसेच माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांना गुरुवारी मागणी राहिली.  या खरेदीपूरक वातावरणामुळे सेन्सेक्स ११४.२९ अंश वाढीसह ३०,९३२.९० या पातळीवर दिवसाअखेरीस स्थिरावताना दिसला. दिवसाच्या व्यवहारात सेन्सेक्स ३०० अंशांपर्यंत उसळी घेताना दिसून आला. त्याचप्रमाणे निफ्टीही ३९.७० अंशाची कमाई करून गुरुवारचे व्यवहार आटोपले तेव्हा ९,१०६.२५ पातळी गाठताना दिसून आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 12:37 am

Web Title: sensex rose by 300 points during the day zws 70
Next Stories
1 पंतप्रधान वय वंदन योजनेला मुदतवाढ
2 निर्देशांक वाढीला वेग
3 मुदत ठेवींसाठी राष्ट्रीयीकृत बँकांना पसंती
Just Now!
X