06 April 2020

News Flash

डिसेंबपर्यंत सेन्सेक्स २२,०००!

दिवाळीपूर्वीच २१ हजाराला जाऊन येणारा सेन्सेक्स पाहून त्याच्या नव्या उच्चांकाचे वेध आता साऱ्यांनाच लागले आहेत.

| October 26, 2013 12:54 pm

दिवाळीपूर्वीच २१ हजाराला जाऊन येणारा सेन्सेक्स पाहून त्याच्या नव्या उच्चांकाचे वेध आता साऱ्यांनाच लागले आहेत. जर्मनीच्या डॉएच्च बँकेनेही भारतीय भांडवली बाजाराबाबतचा आशावाद पूर्वीच्या २१ हजारावरून आता थेट २२ हजारांवर नेऊन ठेवला आहे. बँकेच्या अंदाजानुसार, डिसेंबर २०१३ अखेर सेन्सेक्स २२ हजापर्यंत पोहोचू शकतो. बँकेने यापूर्वी डिसेंबपर्यंत मुंबई निर्देशांक २१ हजारापर्यंत पोहोचेल, असे म्हटले होते. यंदाच्या चांगल्या मान्सूनच्या जोरावर बँकेने हा आशावाद उंचावला आहे. अर्थव्यवस्थेतून आता नकारात्मक वृत्त येण्याचा कालावधी संपला असून गुंतवणूकपूरक वातावरणही दृष्टिपथात आहे, असेही बँकेने म्हटले आहे. देशाच्या एकूण उत्पन्नात ५६ टक्के तर खर्चात ६४ टक्के हिस्सा राखणाऱ्या ग्रामीण अर्थव्यवस्थेने यंदाच्या कालावधीत गेल्या १५ महिन्यातील सर्वोत्तम मान्सून अनुभवला आहे, असेही निरिक्षण बँकेने नोंदविले आहे. सेन्सेक्सने व्यवहारात २१ हजाराचा (२१,०३९.४२) टप्पा याच आठवडय़ात, गुरुवारी गाठला. तर बंद होतानाचा त्याचा १ जानेवारी २००८ रोजीचा २१,२०६.७७ हा ऐतिहासिक टप्पा अद्याप पुन्हा स्पर्शिला गेलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2013 12:54 pm

Web Title: sensex set to touch 22000 mark by december
Next Stories
1 श.. शेअर बाजाराचा : तंत्रज्ञानाशी मत्री.. कराच, सोपं आहे!
2 वीजदर समस्येवर तोडग्यासाठी मंत्रिगटाची स्थापना
3 पर्यावरणीय सेवांची बाजारपेठ २७ हजार कोटींवर जाणार
Just Now!
X