News Flash

ग्रीस-छाया ओसरली

‘ग्रीकएग्झिट’च्या बाजूने आलेल्या ग्रीसमधील सार्वमताच्या निकालावर प्रारंभिक ३०० अंशांच्या घसरणीतून सावरत सोमवारी दिवसअखेर प्रत्यक्षात ११६ अंशांच्या

| July 7, 2015 07:34 am

‘ग्रीकएग्झिट’च्या बाजूने आलेल्या ग्रीसमधील सार्वमताच्या निकालावर प्रारंभिक ३०० अंशांच्या घसरणीतून सावरत सोमवारी दिवसअखेर प्रत्यक्षात ११६ अंशांच्या कमाईसह ‘सेन्सेक्स’ने घेतलेल्या विरामाने ग्रीसच्या सावटापासून स्थानिक भांडवली बाजाराने फारकतीला अधोरेखित केले. अधिक व्यापक रूप असलेल्या ‘निफ्टी’ निर्देशांकाने तर ८,५०० या महत्त्वाच्या पातळीला ओलांडणारी मजल मारली. निफ्टीने सोमवारच्या व्यवहारात ३७.२५ अंशांची कमाई केली.
ग्रीसमधील सार्वमताच्या निकालाबाबत बाजार सकाळी उघडताच अस्वस्थता दिसून आली आणि मोठय़ा फरकाच्या घसरणीने दिवसाची सुरुवात झाली. विशेषत: विदेशी गुंतवणूकदारांनी भीतीने समभागांची विक्री सुरू केल्याचे आढळून आले. परंतु २७,७७४.८० असा तळ पाहणाऱ्या सेन्सेक्सने शेवटच्या टप्प्यात त्या पातळीपासून सुमारे ४६० अंशांची उसळी घेत २८,२३५.३१ अशा उच्चांकापर्यंत प्रवास करणारा मूडपालट दाखविला. सेन्सेक्समधील ३० पैकी १९ समभागांनी शुक्रवारच्या तुलनेत मूल्यवृद्धी साधली.
बाजाराच्या प्रमुख निर्देशांकामधील या सकारात्मक उलटफेरीला, दुपारनंतर उशिराने सुरुवात झाली. त्यासाठी केंद्र सरकारकडून ग्रीस संकटाच्या थेट परिणामाच्या शक्यतेला फेटाळणारे निवेदन आणि देशांतर्गत अर्थचक्राला गती देण्यासाठी मोठय़ा गुंतवणुकीसाठी सरकारने दाखविलेली बांधीलकी कारणीभूत ठरल्याचे जाणकारांचे कयास आहेत. प्रमुख निर्देशांकाव्यतिरिक्त, बाजाराचे व्यापक स्वरूपही सकारात्मक स्तरावरच दिवसअखेर दिसून आले. बीएसई स्मॉल कॅप आणि मिड-कॅप निर्देशांकांनी तर प्रमुख निर्देशांकापेक्षा दमदार अनुक्रमे १.०९ टक्के आणि ०.८५ टक्क्यांनी कमाई केली.
भारताच्या भांडवली बाजारात आश्वासक कलाटणी दिसत असताना, बहुतांश आशियाई (चीन वगळता) तसेच दुपारनंतर सुरू झालेल्या प्रमुख युरोपीय बाजारपेठांमध्ये पडझडीचीच स्थिती होती.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत निरंतर घसरण सुरू असल्याने, शुक्रवारनंतर सलग दुसऱ्या सत्रात स्थानिक बाजारातील तेल व वायू कंपन्यांचे समभाग वधारले.
ल्ल भारतीय बाजाराने ग्रीसमधील आणि पर्यायाने युरोझोन संकटाबाबत चिंतामुक्त उसळीचा प्रत्यय सोमवारी दिला. डॉलरच्या तुलनेत मजबूत बनत असलेला रुपया, तर विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून स्थितीचा फेरआढावा घेत सुरू झालेल्या खरेदीने या बदललेल्या भावनांना आणखीच बळ दिल्याने, निर्देशांकांमध्ये सकारात्मक वाढीसह शेवट झाल्याचे दिसून आले.
ा  गौरव जैन, संचालक हेम सिक्युरिटीज
ल्ल बाह्य़ जोखीम घटक उंचावला असला तरी भारताच्या भांडवली बाजाराची कामगिरी उजवी राहण्याचीच शक्यता आहे. अर्थचक्राला गती देताना सरकारच्या मोठय़ा भांडवली खर्चाच्या योजना, संभाव्य व्याजदर कपात आणि चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीपासून कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीत अपेक्षित असलेला सुधार पाहता विदेशातील गुंतवणूकदारांनाही स्थानिक बाजार आकर्षक राहील.
ा  विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजित बीएनपी परिबा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2015 7:34 am

Web Title: sensex shrugs off greece referendum results nifty settles above 8500
टॅग : Nifty,Sensex
Next Stories
1 ग्रीसमधील पेचप्रसंगाचे भारतावर अप्रत्यक्ष परिणाम शक्य
2 एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंडाच्या मुख्याधिकारीपदी सरोजिनी दिखले
3 तीन वर्षांत ३०० नवीन प्लॅनेट फॅशन स्टोअर्सचे लक्ष्य
Just Now!
X