गेल्या दीड वर्षांतील सर्वात मोठी ८५५ अंशांची आपटी नोंदविल्यानंतरही भांडवली बाजारातील घसरण सलग दुसऱ्या दिवशी बुधवारीही कायम राहिली. ७८.६४ अंश घसरणीसह सेन्सेक्स बुधवारी २६,९०८.८२ पर्यंत आला, तर २५.२५ अंश घसरणीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,१०२.१० वर थांबला. प्रमुख निर्देशांकांचा १७ डिसेंबरनंतरचा हा किमान स्तर राहिला. e08मुंबई शेअर बाजाराने मंगळवारी ८५४.८६ अंशांच्या रूपात एकाच सत्रात गेल्या साडेपाच वर्षांतील सर्वात मोठी आपटी नोंदविली होती. बाजाराची बुधवारची सुरुवातही २७५ अंशांच्या घसरणीनेच झाली. सेन्सेक्समधील टीसीएस, टाटा मोटर्स, आयटीसीचे समभाग ३ टक्क्यांपर्यंत घसरले. तर तेल व वायू क्षेत्रातील समभागांमध्येही २ टक्क्यांपर्यंतची नरमाई होती. सेन्सेक्समधील तब्बल १७ समभाग घसरले.
रुपयाची ४० पैशांची कमाई
तीन सप्ताहातील सर्वोत्तम कामगिरी
-भांडवली बाजारात नरमाई कायम असताना रुपयाने डॉलरच्या तुलनेत बुधवारी अचानक मोठी उसळी घेतली. चलन मंगळवारपेक्षा ४० पैशांनी वाढून ६३.१७ पर्यंत पोहोचले. गेल्या सलग दोन व्यवहारांत रुपया घसरता राहिला. त्यातील घसरण २८ पैशांची होत. बुधवारची वाढ ही १८ डिसेंबरच्या जवळपास ५० पैशांइतकीच आहे.