सलग तिसऱ्या दिवशी मोठय़ा मुसंडी बाजाराची आगेकूच गुरुवारीही कायम राहिली. जागतिक स्तरावरील मागणीत वाढीच्या परिणामी खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीने घेतलेली उसळी तर देशांतर्गत आर्थिक सुधारणांबाबत मोदी सरकारच्या तिसऱ्या वर्षांच्या कारकीर्दीत निर्माण झालेल्या सकारात्मकता बाजारात उत्साह निर्माण करणारी ठरली. परिणामी सेन्सेक्सने २६ हजारापल्याड तर निफ्टी निर्देशांकाने ८,०५० पल्याड सात महिन्यांपूर्वी गमावलेला स्तर पुन्हा सर केले. यंदा पाऊस सरासरीपेक्षा दमदार होण्याच्या कयासांनी बुधवारी सेन्सेक्स ५७६ अंशांनी झेपावला होता. त्यात गुरुवारी आणखी ४८५ अंशांची भर घालून सेन्सेक्स २६,३६७ वर विसावला.