04 June 2020

News Flash

श.. शेअर बाजाराचा : ही गाजराची पुंगी नव्हे

आपण जेव्हा एखाद्या बँकेत जाऊन बचत खाते उघडतो म्हणजे त्या बँकेची जी कुठची शाखा मला सोयीची असेल तिथे जाऊन खाते उघडतो. जरी माझे बचत खाते

| January 25, 2013 12:17 pm

आपण जेव्हा एखाद्या बँकेत जाऊन बचत खाते उघडतो म्हणजे त्या बँकेची जी कुठची शाखा मला सोयीची असेल तिथे जाऊन खाते उघडतो. जरी माझे बचत खाते शाखेत असले तरी पशांची सुरक्षितता वगरे संपूर्ण जबाबदारी मूळ बँकेने घेतलेली असते. त्यामुळे दुर्दैवाने एखाद्या शाखेत काही आर्थिक अफरातफर झाली किंवा दरोडा पडला तरी माझे पसे सुरक्षित असतात. कारण बँकेच्या मुख्य कार्यालयाने ती जबाबदारी घेतली आहे. अगदी हेच तत्व लागू आहे शेअर ब्रोकरबाबत. प्रत्येक ब्रोकरला देशभरात स्वत:च्या शाखा उघडणे शक्य नसते त्यामुळे बहुतांशी ठिकाणी ब्रोकर आपले वितरक (फ्रँचाइझी) नेमतो जे गुंतवणूकदाराला सेवा देतात. सेवा याचा अर्थ गुंतवणूकदाराचे ट्रेडिंग खाते उघडणे, शेअर्सची खरेदी विक्री करून देणे आणि आर्थिक व्यवहार करणे. मात्र हे सर्व मूळ ब्रोकरच्या वतीने होत असते. त्यामुळे गुंतवणूकदाराने चेक देताना तो ब्रोकरच्या नावे दिला पाहिजे वितरकाच्या नावे नको. तसेच शेअर्स विकल्यानंतर मिळणारा चेक ब्रोकरच्या बँक खात्यातून दिलेला असला पाहिजे. इथेच अनेक लोक गफलत करीत असतात. चेकची देवाणघेवाण वितरकाच्या नावे करतात. शेअर्सची खरेदी किंवा विक्री झाल्यानतर जे बिल मिळते त्याला ‘काँट्रक्ट नोट’ म्हणतात ती पण मूळ ब्रोकरच्या नावे असली पाहिजे. उदाहरणार्थ एंजल ब्रोकिंग लिमिटेड, इंडिया इन्फोलाइन लिमिटेड.
बँकेचे मुख्य कार्यालय आणि तिची शाखा हे जसे जाळे आहे तसेच शेअर ब्रोकर आणि वितरक हे जाळे आहे. पण ही सोयरीक अनेक लोकांना माहीत नसल्याने बऱ्याच अप्रिय घटना घडत असतात. वसईत राहणाऱ्या अरुणाताई या एक भगिनी (नाव बदलले आहे) सध्या अशाच प्रकारच्या त्रासाला सामोऱ्या जात आहेत. आशा नावाच्या कुणा एका महिलेकडे त्यांचे ट्रेडिंग खाते आहे असे अरुणाताई म्हणतात. आशाबाई या मुख्य ब्रोकर नसून वितरक आहेत ज्यांच्याकडे आपले दागिने विकून अरुणाताईंनी एक लाख पंचाहत्तर रुपये दिले. त्या पशातून आशाबाई शेअर्सची खरेदी-विक्री करीत राहिल्या आणि आजघडीला फक्त तीन हजार रुपये शिल्लक आहेत असे त्यांना सांगण्यात आले. आपले ट्रेडिंग  खाते कुठल्या ब्रोकरकडे आहे हे देखील अरुणाताई मला सांगू शकत नाहीत. कारण आलेल्या काँट्रक्ट नोट वाचून पाहण्याची तसदीदेखील त्यांनी घेतलेली नाही. इतका विश्वास वितरकावर?
तसे पाहिले तर सेबीने एक बाब स्पष्ट केली आहे की, गुंतवणूकदाराने सूचना दिल्याविना आपल्या मर्जीने ब्रोकर (त्याच्या वतीने वितरक) शेअर्सची खरेदी किंवा विक्री करू शकत नाही. अरुणाताईंच्या बाबती’ जेव्हा पहिल्यांदा हा प्रकार घडला तेव्हाच संबंधित स्टॉक एक्स्चेंज किंवा सेबीकडे तक्रार करणे आवश्यक होते. म्हणजे चौकशी तर सुरू झाली असतीच पण पुढील प्रकार तरी थांबले असते. वितरक आपल्या ग्राहकाला विश्वासात घेऊन भराभर खरेदी करीत सुटतात, शेअर्स विकत राहतात. कारण यातून मिळणाऱ्या दलालीची रक्कम ही त्यांची कमाई असते. अरुणाताईंचे म्हणणे असे की, त्यांना हे व्यवहार झाले हे माहितीच नव्हते! हे कसे बरे शक्य आहे? कारण आज काल स्टॉक एक्स्चेंज प्रत्येक व्यवहार झाला की गुंतवणूकदाराला एसएमएस पाठवत असते. भले ब्रोकर पाठवो न पाठवो पण स्टॉक एक्स्चेंज तर पाठवते ना. दुसरे म्हणजे शेअर्स विकल्यानंतर ग्राहकाच्या डिमॅट खात्यातून शेअर्स वजा झाले की सीडीएसएल थेट डिमॅट खातेदाराला एसएमएस पाठवते. या दोन्ही सेवा विनामूल्य असतात. तात्पर्य ‘मला माहीतच नव्हते’ हे मान्य करायला वाव नाही. अरुणाताईंच्या बाबतीत झाले असे की, त्यांनी ब्रोकरच्या नावे मुखत्यार पत्र दिले असल्याने डिमॅट खात्याचे डिलीव्हरी इंस्ट्रक्शन स्लिप ब्रोकर भरीत असे. तरी देखील सीडीएसएलकडून एसएमएस हा येणारच. या ठिकाणी एक बाब नमूद करावीशी वाटते ती म्हणजे मुखत्यार पत्र देणे हे अजिबात सक्तीचे नसते. अरुणाताई स्वत:च डिलीव्हरी इंस्ट्रक्शन स्लिप  भरून देऊ शकल्या असत्या. त्यामुळे भले आशाताईनी अरुणाताईंच्या सूचनेशिवाय शेअर्स विकले असते तरी डिलिव्हरी स्लिप भरून देण्यास अरुणाताई नकार देऊ शकल्या असत्या. किंबहुना अशा परिस्थितीत ब्रोकर शेअर्स विकण्याचे धाडस करूच शकला नसता.
घरगुती गॅस हा ज्वालाग्राही असतो त्यामुळे तो वापरण्याच्या आधी त्याबाबत सर्व माहिती करून घेणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने अपरिहार्य आहे तसेच शेअर बाजारातील व्यवहाराबाबत म्हणता येईल. सर्व कार्यप्रणाली जाणून घ्या मग यात उतरा. ही गाजराची पुंगी नव्हे जी वाजली तर ठीक, नाही तर खाऊन टाकली!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2013 12:17 pm

Web Title: share broker facility to investor
टॅग Share Market
Next Stories
1 बँकांची बुडीत कर्जे चिंताजनक टप्प्यावर
2 सरकारी तसेच कंपनी रोख्यांमध्ये
3 शतकी घसरणीने ‘सेन्सेक्स’चा साप्ताहिक नीचांक
Just Now!
X