12 November 2019

News Flash

नफेखोरीने घसरण

गेल्या सलग दोन व्यवहारांतील तेजीमुळे मुंबई निर्देशांकात १८०.९४ अंश भर पडली होती.

आठवडय़ातील दुसऱ्या दिवशीच्या सत्रारंभीच वरच्या टप्प्यावर असलेल्या भांडवली बाजारात व्यवहाराच्या समाप्तीस नफेखोरी उमटली. परिणामी सेन्सेक्स सोमवारच्या तुलनेत २५३.११ अंशांनी खाली येत २४,५५१.१७ वर येऊन ठेपला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने त्याचा ७,५००चा वरचा टप्पाही सोडला. प्रमुख निर्देशांकात ७८.१५ अंश घसरण होऊन निफ्टी ७,४६०.६० वर बंद झाला.

गेल्या सलग दोन व्यवहारांतील तेजीमुळे मुंबई निर्देशांकात १८०.९४ अंश भर पडली होती. फेब्रुवारीमधील घसरलेल्या महागाई दराच्या स्वागताकरिता मंगळवारची सेन्सेक्सची सुरुवातही तेजीसह झाली. तासाभरात सेन्सेक्स २४,८४०.७७ वर पोहोचला. मात्र आरोग्यनिगा क्षेत्रासह निवडक क्षेत्रात गुंतवणूकदारांनी नफेखोरीचा अवलंब केला. यामुळे सत्रात अडीचशेहून अधिक अंशांची आपटी नोंदविणारा सेन्सेक्स त्याच्या गेल्या सहा आठवडय़ांच्या वरच्या टप्प्यावरूनही माघारी फिरला. सेन्सेक्समधील २२ समभागांचे मूल्य घसरले. यामध्ये एचडीएफसी, डॉ. रेड्डीज, आयटीसी, अदानी पोर्ट्स, हिंदुस्थान यूनिलिव्हर, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, एशियन पेंट्स, विप्रो, टीसीएस, गेल, इन्फोसिस, कोल इंडिया, ओएनजीसी, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, लार्सन, आयसीआयसीआय बँक यांचा समावेश राहिला.

First Published on March 16, 2016 6:27 am

Web Title: share market falling due to profit making
टॅग Share Market