News Flash

आहे मनोहर तरी!

तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून पुढील आठवडय़ातील निर्देशांकांची आणि प्रमुख समभागांची संभाव्य वाटचाल..

तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून पुढील आठवडय़ातील निर्देशांकांची आणि प्रमुख समभागांची संभाव्य वाटचाल..

गेल्या लेखातील वाक्य होतं, येणाऱ्या दिवसात निर्देशांकावर ३३,५००/१०,४५० हा अवघड टप्पा आहे व या आठवडय़ात निर्देशांकांनी हा टप्पा गाठला. त्यामुळे पुढील आठवडय़ात निर्देशांक ३३,८००/१०,५५० चे नवीन शिखर सर करेल की एखादी संक्षिप्त घसरण असेल?  या प्रश्नांच्या उत्तरासाठी पुढील आठवडा कसा असेल?  त्याचा आढावा घेऊ या.

तेजीची धारणा असलेल्या गुंतवणूकदारांच्या समुहात फार मोठय़ा प्रमाणात भर पडत आहे व आता भविष्यात निर्देशांकावर घसरण ही अशक्यप्राय घटना आहे, अशी मानसिकता वाढत आहे.  असं हे आनंदाचं, उत्साहाचं वातावरण हे खरोखरच मनोहर आहे. पण आपल्यासाठी ‘तरी’ हा शब्द फार महत्त्वाचा आहे.

या महिन्याकरिता ३२,७०० /१०,२५० ही निर्देशांकासाठी ‘डू ऑर डाय’ पातळी असणार आहे.  एखाद्या संक्षिप्त घसरणीत हा स्तर राखण्यात निर्देशांक यशस्वी ठरला तर निर्देशांकावर ३२,७०० / १०,२५० ते ३३,५०० / १०,४५० असा पट्टा (बॅण्ड) तयार होईल.

सद्यस्थितीतील अवघड टप्पा ३३,५०० / १०,४५० च्या वर निर्देशांक सातत्याने पाच दिवस टिकल्यास वरचं उद्दिष्ट हे ३३,८०० / १०,५५० असेल.  अन्यथा ३२,७०० / १०,२५० चा स्तर टिकवण्यात निर्देशांक अपयशी ठरला तर निर्देशांक ३१,८५० / ९,९५० वर विसावेल.

पुढील महिन्यात नाताळ पर्यंत निर्देशांक सातत्याने ३१,८५० / ९,९५० चा स्तर राखण्यात निर्देशांक यशस्वी ठरल्यास निर्देशांक गरुडझेपेसाठी सज्ज होईल. (नाताळपर्यंत गुजरात, हिमाचल विधानसभांचे निवडणूक निकाल व सप्टेंबर तिमाहीचे कंपन्यांचे बरे, वाईट निकाल किंमतीमध्ये परावर्तीत (फॅक्टर इन) होतील.

सोने किमतीचा आढावा :

येणाऱ्या दिवसात रु. २९,००० ही सोन्याच्या भावाबाबतीत ‘महत्त्वाची कल निर्धारण पातळी’ आहे.  हा स्तर टिकवण्यात सोनं अपयशी ठरल्यास सोनं २८,७०० पर्यंत खाली घसरू शकते. अन्यथा रु. २९,००० च्या वर भाव सातत्याने टिकल्यास प्रथम वरचं उद्दिष्ट रु. २९,६०० व नंतर २९,९०० असेल.(सोन्याचे भाव एमसीएक्स आधारित)

लक्षवेधी समभाग..

सन फार्मा

शुक्रवारचा भाव: रु. ५५१.२५

सन फार्माचा आजचा बाजारभाव हा १०० (५२४) ५० (५१३) २० (५३९) या सर्व दिवसांच्या चलत् सरासरीवर आजचा बाजारभाव आहे.  समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा ५२० ते ५६० आहे.  रु. ५६० च्या वर भाव सातत्याने टिकल्यास अल्पमुदतीचे उद्दिष्ट हे रु. ५९० ते ६०० असेल.  रु. ६०० च्या वर सन फार्मा टिकल्यास रु. ६५० ते ७०० ही दीर्घमुदतीची उद्दिष्ट असतील.  या दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीला रु. ५१० चा स्टॉप लॉस ठेवावा.

आशीष अरिवद ठाकूर

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी स्टॉप लॉस व इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 2:27 am

Web Title: share market investment
Next Stories
1 ‘एनपीएस’साठी कमाल वयोमर्यादेत वाढ
2 नोटाबंदीनंतर वर्षभरात क्रेडिट कार्डधारक वाढले
3 ‘फेड’च्या प्रमुख पदासाठी राजन यांच्या नावाची शिफारस
Just Now!
X