‘रॅनबॅक्सी’ आपटला-सदोष डोसमुळे आपल्या दोन औषधांची अमेरिकेतील विक्री मागे घेण्याच्या रॅनबॅक्सीच्या घोषणेमुळे कंपनीचा समभाग सोमवारी भांडवली बाजारात ३.८ टक्क्यांपर्यंत आपटला. रॅनबॅक्सीचा भाव ३५६ रुपयांवर घरंगळला. सेन्सेक्सच्या दफ्तरी कंपनी समभाग दिवसअखेर ही घसरण १.५१ टक्क्य़ांपर्यंत सावरली आणि भाव ३६४.५० रुपयांवर स्थिरावला. मात्र कंपनीचे बाजारमूल्य यामुळे ४३ कोटी रुपयांनी घसरून १५,४४६ कोटी रुपयांवर आले.

‘रिलायन्स’ची मजल ९०० रुपयांपल्याड-महत्त्वाकांक्षी कृष्णा गोदावरी खोऱ्यातून आगामी कालावधीत अधिक वायू उत्पादन होण्याबद्दल रिलायन्स इंडस्ट्रीजने व्यक्त केलेल्या आशेने कंपनीचे समभाग मूल्य मुंबई शेअर बाजाराच्या सोमवारच्या सत्रात थेट ३.८ टक्क्यांपर्यंत उंचावत नेले. शुक्रवारीदेखील ५.७ टक्क्यांनी उंचावणारा रिलायन्सचा समभाग सोमवारी कैक दिवसानंतर ९०० रुपयांपल्याड गेला. दिवसअखेर मात्र वाढ १.९३ टक्क्यांवर सीमित राखत तो ८८५.८० रुपयांवर स्थिरावला. कंपनीचे बाजारमूल्यही यातू न २,८६,२८१ कोटींपर्यंत पोहोचू शकले.