मुंबई : जागतिक बाजाराचे संमिश्र संकेत आणि स्थानिक भांडवली बाजारात माहिती तंत्रज्ञान, बँका आणि अभियांत्रिकी समभागांतील तेजीमुळे मंगळवारी ‘सेन्सेक्स’ ६९ अंशांनी वधारला, तर निफ्टी निर्देशांक ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर फेर धरण्यास यशस्वी ठरला.

बरीच उलटफेर झालेल्या मंगळवारच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक – सेन्सेक्स सत्रात गाठलेल्या उच्चांकावरून २३६ अंश गमावत, सत्र अखेर अवघ्या ६९.३३ अंशांच्या कमाईसह ५८,२४७.०९ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीमध्ये २४.७० अंशांची वाढ झाली. त्याचा दिवसअखेरचा १७,३८० चा बंद ही त्याची नवीन अत्युच्च बंद पातळी आहे.

सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँकेचा समभाग ४ टक्के  वाढीसह तेजीत आघाडीवर होता. त्यापाठोपाठ एचसीएल टेक, बजाज ऑटो, टेक महिंद्र, एल अँड टी वाढले.