पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी सलग दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर हर्षोल्हसित दलाल स्ट्रीटवर शुक्रवारी सेन्सेक्सने उच्चांक गाठला. शुक्रवारी शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स २५४. २५ अंकांनी वधारुन ४०, ०८६.२२ वर पोहोचला. तर निफ्टीतही ७९. ३५ अंकांनी वाढ झाली असून निफ्टीने शुक्रवारी सकाळी १२, ०२५. २५ चा टप्पा गाठला.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या महाविजयानंतर नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक शपथविधी सोहळा गुरुवारी संध्याकाळी दिल्लीत पार पडला. शुक्रवारी सकाळी कोणाला कोणते खाते मिळणार हे स्पष्ट होणार असून अमित शाह यांचे नाव अर्थमंत्रीपदासाठी चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शेअर बाजारातही उत्साहाचे वातावरण दिसून आले.

शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स २५४. २५ अंकांनी वधारुन ४०, ०८६.२२ वर पोहोचला. तर निफ्टीही ७९. ३५ अंकांच्या वाढीसह १२, ०२५. २५ पर्यंत पोहोचला.