क्रॉस प्लॅटफॉर्म शेअिरग’साठी अल्पावधीत पसंती मिळालेले जागतिक स्तरावरील आघाडीचे शेअरइट या अॅपने १० कोटी भारतीय वापरकर्त्यांचा पल्ला गाठला आहे. भारतात २०१४ मध्ये हे अॅप उपलब्ध झाले होते. शेअरइटचे सक्रिय वापरकर्ते हे अॅप आठवडय़ात पाच दिवसांहून अधिक कालावधीसाठी वापरत असल्याने त्याची बरोबरी व्हाट्सअप, फेसबुकबरोबर होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. शेअरइटचे जगभरात ४० कोटींहून अधिक वापरकर्ते असून नुकतेच शेअरइट या अॅपने बांग्लादेश, फिलिपाइन्स, उझबेकिस्तान, अल्जेरिया, ओमान, इजिप्त, दक्षिण आफ्रिका, नेपाळ, मलेशिया, कतार, सिंगापूर आणि कुवेत आदी देशांमध्ये आघाडीचे स्थान पटकाविल्याचे कंपनीने म्हटले आहे.