News Flash

छोटे गुंतवणूकदार; वाढता कल..

रिझव्‍‌र्ह बँकेने २०१५ मध्ये आतापर्यंत व्याजदरात सव्वा टक्क्यापर्यंत कपात केली आहे

विकसित देशांशी तुलना करता भारतातील कंपन्यांच्या समभागांमधील गुंतवणूक अजूनही कमी आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने २०१५ मध्ये आतापर्यंत व्याजदरात सव्वा टक्क्यापर्यंत कपात केली आहे. त्यामुळे यापुढे मुदत ठेवींतून मिळणारे उत्पन्न कमी असणार, हे निश्चित आहे. सोन्यामध्ये केलेली गुंतवणूकही फारशी लाभदायक नाही. करपश्चात आणि सर्व खर्च वजा जाता मिळणारे परतावे पाहायला गेले तर उच्च पतप्रवाहासह उत्तम परतावे मिळवण्याकरिता समभाग हाच उत्तम पर्याय ठरतो.

बाजारपेठेत वाढीस पोषक वातावरण आणि बाजारपेठेने कमावलेला गुंतवणूकदारांचा विश्वास यामुळे भांडवली बाजारात छोटे गुंतवणूकदार पुन्हा एकदा उद्युक्त झाल्याचे दिसते. चालू आíथक वर्षांच्या पहिल्या सहामाहीमध्ये समभाग निगडित म्युच्युअल फंडांमध्ये करण्यात आलेल्या गुंतवणुकीत वार्षकि स्तरावर झालेल्या ३० टक्के वाढीतून हेच दिसून येते. देशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून झालेली गुंतवणूक तब्बल ६३,००० कोटी रुपये असून त्यांनी विदेशी गुंतवणूकदार संस्थांमार्फत होणाऱ्या गुंतवणुकीलाही याबाबत मागे टाकले आहे.
किरकोळ गुंतवणूकदारांना बाजारात पुन्हा एकदा रस वाटू लागला आहे याचे श्रेय महागाई कमी होणे, व्याजदरात घट होणे, जागतिक स्तरावर वायदा वस्तूंच्या किमती कमी होणे आणि सुशासन अशा घटकांना देता येईल. या सर्व कारणांमुळे पुढील १८ ते २४ महिन्यांमध्ये कंपन्यांच्या वित्तीय कामगिरीतही सुधारणा होईल, अशी चिन्हे दिसत आहेत. चीनमधील अर्थव्यवस्था मंदावत असताना आणि ब्राझील व रशियासारख्या विकसनशील बाजारपेठांना वायदा वस्तूंच्या कमी किमतींचा बसलेला फटका यामुळे भारतात होणारी गुंतवणूक व निधीप्रवाह आपसूकच वाढला आहे. यापुढेही भारतात मोठय़ा प्रमाणावर विदेशी गुंतवणूकदार संस्थांमार्फत गुंतवणूक होतच राहील आणि त्याला स्थानिक स्तरावरील गुंतवणुकीची जोड मिळत राहील असे वाटते आणि तेच आपल्या बाजारपेठेचे बलस्थान असेल.
जागतिक स्तरावर वस्तूंच्या किमतींत झालेली घसरण, कंपन्यांच्या मिळकतीला आणि पर्यायाने भारतीय अर्थव्यवस्थेला उपकारक ठरू शकेल. आयात केलेला स्वस्त माल आणि अनुदान खर्चात केलेली कपात यामुळे सरकारला मोठय़ा प्रमाणावर निधी मिळाला आहे. हा निधी पायाभूत विकासासारख्या अधिक उत्पादक क्षेत्राकरिता वापरता येणार आहे.
हे सर्व घटक लक्षात घेता भारताची स्थिती अतिशय सक्षम आहे आणि आपल्या कामगिरीतूनही बाजारपेठेतील परिस्थितीमध्ये झालेली सुधारणा प्रतििबबित होत आहे. इतर मालमत्ता वर्गाकडून मिळणाऱ्या परताव्यांमध्येही वाढ होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर महागाईचा दर कमी होत असल्याने यापुढील काळात बचतीचा दर वाढेल आणि यातून झालेली बचत अर्थातच समभाग बाजारातील गुंतवणुकीकरिता वापरता येईल, अशी अपेक्षा आहे. बँकेतील ठेवींकरिता देऊ केलेल्या ६ ते ७ टक्के इतक्या करपश्चात परताव्याच्या तुलनेत गेल्या दोन वर्षांमध्ये निफ्टी निर्देशांकाने १८ टक्के आणि स्थावर मालमत्ता क्षेत्राकरिता लवळपास ४ टक्के (एनएचबी रेसिडेक्सनुसार पहिल्या ७ शहरांमध्ये) परतावा देऊ केलेला आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर सोन्याचे मूल्य मात्र कमी झालेले आहे.
व्याजदरात घट होत असल्याने नियत ठेवींवर मिळणारे उत्पन्न कमी झाले आहे आणि महागाईचा दरही कमी होत असल्याने रिझव्‍‌र्ह बँकेने २०१५ मध्ये आतापर्यंत सव्वा टक्का कपात केली आहे. त्यामुळे यापुढेही नियत ठेवींतून मिळणारे उत्पन्न कमी असणार, हे निश्चित आहे. सोन्यामध्ये केलेली गुंतवणूकही फारशी लाभदायक नाही. करपश्चात आणि सर्व खर्च वजा जाता मिळणारे परतावे पाहायला गेले तर उच्च पतप्रवाहासह उत्तम परतावे मिळवण्याकरिता समभाग हाच उत्तम पर्याय ठरतो.
आजच्या तरुण गुंतवणूकदारांना इंटरनेट आणि मोबाइलच्या माध्यमातून उत्तम आर्थिक सल्ला मिळणे शक्य झाले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये नियोजनबद्ध गुंतवणूक योजनेमध्ये (एसआयपी) होणारी गुंतवणूक वाढली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची भांडवली बाजारपेठेकडे कायम लक्ष ठेवण्याची गरजही मिटली आहे. विकसित देशांशी तुलना करता भारतातील कंपन्यांच्या समभागांमधील गुंतवणूक अजूनही कमी आहे. समभागातून मिळणाऱ्या उच्च परताव्यांबद्दल पुरेशी जागरूकता निर्माण झाल्यास पुढील काही वर्षांमध्ये ही गुंतवणूक वाढू शकेल.
(लेखक ‘एंजल ब्रोकिंग’चे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2015 2:15 am

Web Title: shares is best investment options for small investors
टॅग : Investment,Shares
Next Stories
1 नोव्हेंबरमध्ये व्यापार तूट किंचित वाढली
2 Mutual Fund: ओळख संपत्ती व्यवस्थापनाची
3 महागाई वाढलीच!
Just Now!
X