सहल आयोजनातील अग्रेसर कंपनी थॉमस कूक (इंडिया) लि.ने सर्वसामान्य कुटुंबांना अविस्मरणीय सहलीचे स्वप्न साकारण्यासाठी सुरू केलेली बचत योजना अर्थात ‘हॉलिडे सेव्हिंग्ज अकाऊंट’ योजनेच्या विपणनासाठी ‘शॉप सीजे नेटवर्क प्रा. लि.’ या होम-शॉपिंग कंपनीशी सामंजस्याची बुधवारी घोषणा केली. भारतातील आणि विदेशातील १५ पर्यटनस्थळांच्या पॅकेजसाठी थॉमस कूकला यामुळे आता शॉप सीजे ग्राहक मिळवून देणार आहे. थॉमस कूकच्या या बचत योजनेत सर्वसमावेशक सहलीच्या पॅकेजच्या खर्चाची सहल इच्छुकाने दरमहा बचत करावयाची असते. इंडसइंड, आयसीआयसीआय तसेच कोटक बँकेत जमा होणाऱ्या या १२ हप्त्यांवर ग्राहकाला आकर्षक व्याज आणि थॉमस कूककडून जमा केल्या जाणाऱ्या १३व्या हप्त्याचा लाभ मिळेल. वर्षभरात जमा होणाऱ्या रकमेवर सहलीचा संपूर्ण खर्च भरून निघेल. अशा या अनोख्या संकल्पनेला लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी, घराघरात टीव्ही वाहिनी (सीजे लाइव्ह) त्याचप्रमाणे मोबाइल अ‍ॅप व वेबद्वारे सुमारे ७.५ कोटी कुटुंबांपर्यंत विस्तार असलेल्या शॉप सीजेचे जाळे एक उत्तम व्यासपीठ ठरेल, असा विश्वास थॉमस कूकने व्यक्त  केला.