News Flash

नामांतरासह ‘शॉप सीजे’ला लवकरच नफ्याचेही वेध

स्टार टीव्हीसह सुरू असलेले सख्य संपुष्टात आल्यानंतर, आघाडीच्या कोरियन होम शॉपिंग टीव्ही वाहिनीने स्टार सीजेवरून ‘शॉप सीजे’ असे नवे नामाभिधान आणि बोधचिन्हासह प्रवास सुरू केला

| April 18, 2015 01:38 am

स्टार टीव्हीसह सुरू असलेले सख्य संपुष्टात आल्यानंतर, आघाडीच्या कोरियन होम शॉपिंग टीव्ही वाहिनीने स्टार सीजेवरून ‘शॉप सीजे’ असे नवे नामाभिधान आणि बोधचिन्हासह प्रवास सुरू केला असून, पुढील आर्थिक वर्षांत कंपनी नफाक्षम बनणेही अपेक्षित आहे. २००९ साली स्टार समूह आणि कोरियाच्या सीजे ओ शॉपिंग कं. लि.च्या समान भागीदारीतून सुरू झालेल्या या कंपनीत, आता स्टारची जागा प्रॉव्हिडन्स इक्विटी पार्टनर्सने भागीदार म्हणून घेतली आहे. शॉप सीजेचे मुख्याधिकारी केनी शिन यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, भारतातील होम शॉपिंग बाजारपेठेचा कंपनीकडे सध्या ४० टक्के हिस्सा असून, आगामी आर्थिक वर्षांत गत पाच वर्षांत केलेल्या गुंतवणुकीपेक्षा अधिक मिळकतीची कंपनीला अपेक्षा आहे. देशात सध्या टीव्ही शॉपिंगची साधारण ४५०० कोटी रुपयांची बाजारपेठ असून, शॉप सीजेची वर्तमान ६५० कोटी रुपयांची विक्री उलाढाल पाहता, ती होम शॉपिंग १८ नंतर या बाजारपेठेतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी ठरली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2015 1:38 am

Web Title: shop size
Next Stories
1 भिन्न व्याजदराने मुदत ठेवी स्वीकारण्यास बँकांना मुभा
2 गव्हर्नर राजन यांना ‘इसिस’कडून धमकीचा ई-मेल
3 आर्थिक विकास १० टक्के दराने साधण्याची भारतात धमक
Just Now!
X