व्यवसायांना व व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांची ऑनलाईन विक्री करता यावी याकरिता संपूर्ण व्यावसायिक पर्यावरण सादर करणारा आंतरराष्ट्रीय ई-कॉमर्स व्यासपीठ असणा-या शॉपमॅटिकने व्यवसाय सेवा पुरवठादार म्हणून आपली काय्रे अधिक विस्तृत करत असल्याची घोषणा केली आहे. नव्याने दाखल करण्यात आलेल्या या व्यासपीठाच्या माध्यमातून सेवा उद्योजकांना बहु उपाययोजना देऊ केल्या जाणार आहेत आणि त्यांना त्यांच्या सेवा अधिकाधिक ग्राहक वर्गापर्यंत पोहोचवता याव्यात याकरिता प्रोमोशन व विक्रीमध्ये मदत केली जाणार आहे. सर्व ई-कॉमर्स कंपन्या ऑनलाईन विक्री करता येऊ शकतील अशा क्लासिफाईड सेवा देऊ करतातच असे नाही, त्यामुळे शॉपमॅटिक अशा प्रकारची सुविधा देऊ करणारी उद्योगातील पहिली कंपनी ठरली आहे. व्यवसाय सेवांमध्ये पदार्पण करणारी शॉपमॅटिक ग्राहकांच्या सर्व गरजांची पूर्तता करणारा एकमेव ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणून आपले स्थान बळकट करेल. शिवाय, बेरोजगार लोकांना त्यांच्या सेवा कोणत्याही अडथळ्याशिवाय देऊ करण्याची क्षमता देऊ करुन त्यांना सक्षम करेल. ही कंपनी सर्वप्रथम सात खास सेवा दाखल करणार असून त्यामध्ये ब्युटी, एज्युकेशन, वेडींग एॅंड इव्हेण्ट, हेल्थ सर्वसेसि, इंटिरीयर डेकोरेशन, रिअल इस्टेट इत्यादींचा समावेश आहे.