देशातील संपूर्ण स्वयंपूर्ण दूरसंचार कंपनी असलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्सने दोन आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅक त्यांच्या पोस्टपेड जीएसएम ग्राहकांसाठी सादर करत असल्याचे जाहीर केले. या योजनेमुळे रिलायन्सचे ग्राहक ४२ ठिकाणी व्हॉइस कॉलवर ९२ टक्क्यांपर्यंत बचत करू शकतील. तर अन्य योजनेनुसार ब्रिटनमध्ये रोमिंगवर असताना दरमहा ८४९ रुपयात इंटरनेट शुल्कावर ९६ टक्के आणि व्हॉइस कॉलवर ८२ टक्क्यापर्यंत सवलत दिली आहे. अमेरिकेसाठी यापूर्वी सादर करण्यात आलेल्या पॅकची पुनर्रचना करण्यात आली असून त्यात आता १० रुपयात कॉल आणि इंटरनेटचा लाभ घेता येईल. दरवर्षी देशातील लाखो पर्यटक भारताबाहेरील विविध ठिकाणांना भेटी देतात; त्यामुळेच ग्राहकांना विविध उत्पादने आणि सेवा पुरविण्याचा घेतलेला वसा कायम ठेवत आरकॉमने ग्राहकांना त्यांच्या भारतातील सर्व मोबाइल नंबरशी सातत्याने जोडलेला राहता यावे यासाठी अभिनव आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅक सादर केल्याचे कंपनीने म्हटले आहे. इंटरनेटचे शुल्कही मोठय़ा प्रमाणात कमी करण्यात आले असून रिलायन्स कम्युनिकेशन्सचे ग्राहक अमेरिका पॅकचा पर्याय निवडून केवळ अमेरिकेत रोमिंगवर असताना १० रुपये प्रति एमबी पसे भरून इंटरनेट वापरू शकतात.
‘नापतोल डॉट कॉम’ला आशिया रिटेल काँग्रेस पुरस्कार
मुंबई : भारताचे प्रमुख तुलनात्मक आधारित सोशल शॉपिंग पोर्टल नापतोल डॉट कॉमने ऑनलाईन शॉपिंग आणि ई-कॉमर्सच्या प्रकारातील आशिया रिटेल काँग्रेसद्वारे ‘रिटेलर ऑफ द इयर’चा सन्मान प्राप्त केला आहे. विजेता म्हणून सिद्ध होताना नापतोल डॉट कॉमने या वर्गवारीतील सहा इतर स्पर्धकांना मागे टाकले. नापतोल डॉट कॉमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनू अगरवाल यांनी मुंबईमध्ये आयोजित पुरस्कार सोहळ्यामध्ये नापतोल डॉट कॉमच्या वतीने अवॉर्ड प्राप्त केला. आशिया रिटेल काँग्रेस जागतिक दर्जाच्या रिटेल उपक्रमांना प्रोत्साहित करणारे आशियातील एकमेव सर्वात महत्त्वाचे जागतिक व्यासपीठ आहे. रिटेल क्षेत्राच्या जगतातील अस्थिरता, अनिश्चितता, जटिलता आणि संदिग्धता यांच्याशी संबंधित बदलत्या वातावरणाच्या मुद्दयांचा प्रभाव आणि त्याबाबतची चर्चा यावर हा पुरस्कार सोहळा केंद्रित होता.
सायबरोमकडून उद्योगांकरिता उत्पादनांचे अनावरण
मुंबई : जागतिक पातळीवरील सुरक्षाविषयक उपकरणे पुरवणारी अग्रगण्य कंपनी असलेल्या सायबरोमने नेक्स्ट-जेन फायरवॉल्स दाखल केले आहेत. या नव्या मॉडेलमुळे सायबरोमची सद्य एनजीएफडब्ल्यू उत्पादन श्रेणी बळकट होणार आहे आणि त्यातून मध्यम-मोठ्या उद्योगांकरिता सर्वोत्तम सुरक्षाविषयक उपकरणे देऊ केली जाणार आहेत. ईप्सित आरओआयसोबत उच्च कामगिरीच्या शोधात असेल तर ही  श्रेणी  बरेच पर्याय देऊ करते, असा दावा कंपनीने केला आहे. सायबरोमचे एसव्हीपी अभिलाष सोनावणे म्हणाले, ‘मध्यम-मोठय़ा उद्योगांना अनेकदा कामगिरी, सुरक्षा, लवचिकता आणि किंमतीच्या बाबतीत तडजोडी करायला लागतात. सायबरोमच्या नव्या नेक्स्ट-जेन फायरवॉल्स या सर्व परिमाणांची पूर्तता करून ही दरी सांधतात.’ मध्यम-मोठ्या उद्योगांकरिता आवश्यक असलेली कामगिरी आणि अतिप्रगत सुरक्षा वैशिष्टये प्राप्त होतात, असेही सांगण्यात आले आहे. फ्लेक्सी पोर्ट्समुळे हवे तेव्हा, हवे ती नेटवर्क इंटरफेस मॉड्यूल्स घालता येत असल्याने किंमतीतही घट होते आणि आपली गुंतवणूकही सुरक्षित राहते, असेही कंपनीने म्हटले आहे.
झायडेक्सच्या नॅनोटेक्नॉलॉजीला ‘इंडियाज बेस्ट इन्नोव्हेशन’
मुंबई : बडोदा येथील झायडेक्स इंडस्ट्रीज या आघाडीच्या संशोधन संस्थेला मिळणाऱ्या पुरस्कारांची संख्या सातत्याने वाढत असून प्रथमच काही विकसित केल्यासाठी मिळणारे पुरस्कारही वाढले आहेत.  झायडेक्स नॅनोटेक्नॉलॉजी हे  जगभरांतील मान्यताप्राप्त आणि कमी खर्चातील तंत्रज्ञान असून त्यामुळे खड्डेमुक्त रस्ते निर्माण करणे शक्य होईल.  कंपनीच्या या प्रयोगाला मॅरिको इन्नोव्हेशन फाऊण्डेशन  (एमआयएफ) कडून ‘इंडियाज बेस्ट इन्नोव्हेशन’चा पुरस्कार मिळाला आहे.  २००६ मध्ये सुरू झालेले मॅरिको इन्नोव्हेशन अ‍ॅवॉर्डस हे भारतातील सर्वात मोठा असा मंच असून जो भारतीय सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनोख्या नाविन्यांचा गौरव करते. डॉ. माशेलकरांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या परीक्षक मंडळाने दोन पेमढऱ्यांमध्ये २५८ अर्जाची छाननी करून ‘इंडियाज बेस्ट इन्नोव्हेशन’ हा पुरस्कार अनोखेपणा, परिणाम आणि स्थर्य या निकषांनुसार घोषित केला.  याआधी या प्रक्रियेत एमआयएफचे नॉलेज पार्टनर असलेल्या ब्रेन अ‍ॅन्ड कंपनी ने अंतिम फेरीसाठी कंपन्यांची निवड केली.   
‘पोपले ग्रुप’चे नवे उत्पादन
मुंबई : भारताच्या उच्चभ्रू जीवनशैलीच्या परंपरेत गेल्या ८५ वष्रे कार्यरत असलेल्या पोपले ग्रुपने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवे उत्पादन सादर केले आहे. यात सोने तसेच मौल्यवान खडय़ांच्या कुंदनांचा अधिक समावेश करण्यात आला आहे. गुढी पाडव्याच्या निमित्ताने हे सर्व कलेक्शन वांद्रे येथील टर्नर रोड भागात असलेल्या पोपले स्टोरमध्ये २६ मार्चपासूनच उपलब्ध आहे. ग्राहकांची आवड तसेच त्यांना पसंत पडतील अशापद्धतीने या कलेक्शनमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर वळणदार कलाकृती या पारंपारिकता व समृद्धतेचा प्रत्यय देणा-या आहेत. प्रत्येक नक्षीत कुंदन व खडय़ांचा मिलाफ एका वेगळ्या शैलीत सादर केला गेला आहे. भारताच्या संपन्नतेचा मुलभाव त्या ठिकाणी जाणवण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने तयार करण्यात आलेले हे नमुने आपल्या हिंदू संस्कृतीतील महत्त्वाच्या दिवशी व साडे तीन मुहूर्तातील शुभ दिनी परिधान करता येणार आहेत. त्या अनुषंगानेच त्याची रचना व सादरीकरण केले गेले आहे. यात गळ्यातील हारांच्या, म्हणजेच नेकलेसच्या विविध डिझाईन्स, कानातील रंगा, कडा आदींची वैविध्यता आहे. या सणाच्या निमित्ताने एका वेगळ्या पद्धतीने पारंपारिक दागिने परिधान करता येतील, हे निश्चित, असा दावा कंपनीने केला आहे.