सिनेन्सने लघु व मध्यम उद्योगांकरिता उत्पादकता पर्यटन आयोजित केले आहे. या दरम्यान ८६ शहरांतील २०४ स्थळे पालथी घातली जाणार आहेत.
याअंतर्गत निर्माण आणि कार्यक्षमतेत सुधारणा करण्याकरिता अनेक अभिनव तंत्रज्ञानांवर भर दिला जाणार असून एसएमईंकरिता वित्तीय पर्यायांचे प्रदर्शन केले जाणार आहे. मुंबईत १३ नोव्हेंबर या कालावधीत शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सिमेन्स प्रोडक्टिव्हीटी टूरचे आयोजन करणार आहे.
नवी दिल्लीत या उपक्रमाची सुरुवात झाल्यानंतर ५० हून अधिक शहरांमध्ये भ्रमंती करणारा ‘सिमेन्स प्रोडक्टिव्हीटी टूर’बाबत सिमेन्स दक्षिण आशियाच्या उद्योग विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि सेक्टर क्लस्टर भागाचे मुख्य भास्कर मंडल म्हणाले, एसएमई क्षेत्रातील निर्मात्यांनी निर्माणात सुधारणा करून आणण्याच्या, लवचिकता वाढवण्याच्या, किंमतींचे इष्टतमीकरण करण्याच्या आणि लाभांश चढवण्याच्या दृष्टीने नवीनतम तंत्रज्ञानांचा अवलंब करणे गरजेचे आहे.
या टूरमध्ये अभिनव उत्पादनांचे प्रदर्शन केले जाणार आहे. या टूरमध्ये  उत्पादनांशिवाय सिमेन्स फायनान्शियल सíव्हसेस (एसएफएस)चे प्रदर्शन केले जाणार आहे.
एसएफएस हा बिझनेस-टू-बिझनेस वित्तीय उपाययोजनांचा आंतरराष्ट्रीय पुरवठादार आहे. एसएफएसमुळे उद्योगांना गुंतवणूकविषयक साहाय्य मिळते व व्यावसायिक वित्त सहज उपलब्ध होते.