मार्च २०२१ मध्ये भारतात सोन्याची आयात १६० टनांवर पोहोचली आहे. विविध घटकांच्या प्रभावामुळे आधीच्या वित्त वर्षाच्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात सोन्याच्या आयातीमध्ये ४७१% ची वाढ नोंदवली गेली.

टाळेबंदीबाबतचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर अमेरिका, ब्रिटन यासारख्या निर्यात बाजारपेठांमधून भारताच्या रत्ने व दागिने उत्पादनांच्या मागणीमध्ये झालेली वाढ, देशातील लग्नसराईची सुरुवात, सराफा व्यवसायात आलेली तेजी व ग्राहकांकडून नोंदवलेली गेलेली मागणी तसेच सोन्याच्या किमतीमध्ये झालेली मोठी घसरण असे अनेक घटक सोन्याच्या आयातीमध्ये झालेल्या वाढीस कारणीभूत ठरले असल्याचे ‘जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल’कडून (जीजेईपीसी) सांगण्यात आले.

सोन्याच्या मागणीत झालेल्या वाढीला कारणीभूत ठरलेल्या अनेक घटकांमध्ये, देशांतर्गत बाजारपेठांमध्ये आणि विविध देशांमध्ये याच काळात आलेले सणासुदीचे दिवस, खाणकाम आणि निर्यात व्यवसायाची, देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठांमध्ये उत्पादन कामांची पुन्हा सुरुवात, करोना प्रतिबंधित लस आणि प्रत्यक्ष लसीकरण, प्रवासावरील निर्बंध कमी होणे आदींचा समावेश आहे.

याशिवाय ‘जीजेईपीसी’ने अनेक वेगवेगळ्या आभासी रत्ने व दागिने कल मेळाव्याचे आणि विक्रेते-खरेदीदारांच्या संमेलनांचे (व्हीबीएसएम) आयोजन केले होते; यामुळे भारतीय उत्पादकांकडून विविध रत्ने व दागिने उत्पादनांसाठी नोंदवले जाणाऱ्या मागणीला प्रोत्साहन मिळाले, असेही निरिक्षण आहे.

देशांतर्गत मागणीमध्ये होत असलेल्या वाढीमुळे सोन्याच्या आयातीला प्रोत्साहन मिळत असल्याचे नमूद करत ‘जीजेईपीसी’चे अध्यक्ष कोलीन शाह यांनी सांगितले की, मौल्यवान धातूच्या मागणीबाबत योग्य, सुस्पष्ट निष्कर्षापत पोहोचण्यासाठी येत्या काही महिन्यांमध्ये बाजारपेठेतील एकंदरीत कल याचे आपण सर्वसमावेशक पद्धतीने अवलोकन केले पाहिजे.  मागील वर्षीची आयात कमी असणे, सोन्याच्या किमतींमध्ये झालेली घसरण, आयात शुल्क कमी होणे यासारखे घटक या काळात देशात सोन्याची आयात वाढण्याला कारणीभूत ठरले. २०१८-१९ मध्ये सोन्याची सरासरी आयात जवळपास ८० टन होती; जी मागच्या वर्षी ५० टनांपर्यंत कमी झाली.

मार्च २०२० मध्ये कोविड-१९ चा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे अवघे २८ टन सोने आयात करण्यात आले. यामुळे तुलनात्मकदृष्ट्या यंदाच्या वर्षीची सोन्याची आयात सरस ठरली आहे. सर्वसाधारण परिस्थितीत महिन्याभरात सरासरी ६० ते ८० टन सोने आयात केले जाते.  परंतु मार्च २०२० मध्ये झालेल्या कोविड-१९ उद्रेकामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दागिन्यांच्या मागणीत कमालीची घट झाली.

वाढीमध्ये विविध घटकांचे योगदान

सोन्यावरील शुल्कामध्ये ७.५% पर्यंतची घट करण्यात आल्यामुळे अधिकृत माध्यमांद्वारे आयातीला प्रोत्साहन मिळाले.

सोन्याच्या सध्याच्या किमती भविष्यात तशा राहणार नाहीत, अशी भावना असल्याने किमतींमध्ये घट झाल्याचा संधीचा फायदा गुंतवणूकदारांनी घेतला.

कोविड-१९ चा प्रादुर्भाव सुरु झाल्यामुळे मार्च २०२० मध्ये २८ टन सोने आयात करण्यात आले होते; त्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या यंदाच्या वर्षीची सोन्याची आयात सरस ठरली.

विविध निर्यात बाजारपेठांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथिल करण्यात आले  आणि भारतातील लग्नसराईने खरेदी उत्साह.