सिम कार्डसाठीच्या कागदपत्रांची शहानिशा तसेच योग्य कागदपत्रांची नेमकी ओळख करण्याच्या प्रसाराचा भाग म्हणून मोबाईल ग्राहकसंख्येत देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या व्होडाफोन इंडियाने आपल्या वितरकांना शिक्षणाचा अनोखा मार्ग उपलब्ध करून दिला.
कंपनीच्या मुंबईतील ‘एक मुलाकात’ अंतर्गत कागदपत्रांच्या योग्य प्रक्रियेविषयी आणि त्यामुळे सिम कार्ड फसवुणकीच्या प्रकाराला कसा आळा घालता येईल यासाठीच्या कार्यक्रमात पोलिस रण्यात आले होते. पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि व्होडाफोनचे ४० वितरक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
साकीनाक्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी समद शेख व कंपनीच्या मुंबई परिमंडळाचे नलिन जैन यांनी, समाजकंटकांना आळा घालण्यासाठी सिम कार्ड किंवा जोडणी विकण्यापूर्वी योग्य कागदपत्रांद्वारे ग्राहकाची ओळख प्रस्थापित होण्याचे महत्त्व समजावून सांगितले.
उपक्रमाविषयी व्होडाफोनचे व्यवसाय प्रमुख इश्मीत सिंग म्हणाले, ‘ग्राहकाची पडताळणी हा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा मुद्दा असून योग्य कागदपत्रे प्रक्रिया होण्यासाठी वितरकांना शिक्षित करण्याची गरज आहे. अचूक ग्राहक पडताळणी प्रक्रियेची वितरकांना योग्य माहिती मिळावी म्हणून या उपक्रमाद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा हेतू आहे.’
वरिष्ठ पोलिस अधिकारी समद शेख यावेळी म्हणाले, ‘देशाची सुरक्षा लक्षात घेऊन सरकार नियमतयार करत असते आणि या नियमांच्या योग्य अंमलबजावणीकडे लक्ष देणे हे आमच्या विभागाचे कर्तव्य आहे. व्होडाफोन इंडिया ही एक जबाबदार कंपनी असून कायदा व सुव्यवस्था यंत्रणेसोबत काम करून सिम कार्ड वितरकांद्वारे सर्व नियमांची अंमलबजावणी होत आहे की नाही याकडे या उपक्रमाद्वारे जातीने लक्ष देत आहे, हे स्तुत्य आहे.’