एन. एस. वेंकटेश

जेव्हा एसआयपीचा मुद्दा येतो तेव्हा गुंतवणुकीच्या निर्णयात मानसिकदृष्टय़ा पक्षपाती राहाणे टाळावे. ज्यावेळी बाजारात अनिश्चितता असते  त्यावेळी गुंतवणूकदार त्याच्या दीर्घकालीन गुंतवणुकीच्या उद्देशापासून दूर जाताना दिसतात व अनेकदा एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याचे सोडून देतात. बाजारात मंदी आल्याने गुंतवणूकदार कच खाऊन एसआयपी थांबविण्याचा विचार करत असेल तर काय म्हणावे?

गुंतवणूक ही वैयक्तिक बाब असून त्यात एखाद्याचा प्राधान्यक्रम आणि भावना निगडित असू शकतात. संपत्तीची निर्मिती करण्याचा संबंध एखाद्याची महत्त्वाकांक्षा आणि आर्थिक उद्देशाशी असतो. गुंतवणुकीशी भावना निगडीत असल्यास बाजारात चलती असताना  गुंतवणूकदाराचे वागणे अविचारी असू शकते. तसेच बाजार गडगडत असताना गुंतवणूक काढून टाकण्यावर त्याचा भर असू शकतो म्हणजे सारासार विचार करण्याच्या अगदी विरुद्ध!

दरम्यानच्या काळात गुंतवणुकीची वृत्ती आणि पद्धत अशा दोन्ही बाबतीत छोटय़ा गुंतवणूकदारांमध्ये बराच फरक झालेला दिसतो. भारतीयांची चलन आणि जमा रकमेत असलेली गुंतवणूक आर्थिक वर्ष २०१६ मध्ये ५५% असून ती आर्थिक वर्ष २०१८ दरम्यान ५१% पर्यंत घसरली. वास्तविक भारतीयांचा समभागामधील स्थानिक हिस्सा पाहता आर्थिक वर्ष २०१६ मध्ये ३% वरून वाढून आर्थिक वर्ष २०१८ मध्ये ८% वर पोहोचला.

याशिवाय, वैयक्तिक गुंतवणूकदार त्यांच्या आवडीचा गुंतवणूक मार्ग म्हणून नियोजनबद्ध गुंतवणूक (एसआयपी) ची निवड करताना दिसतो. सुमारे २.७४ कोटी म्युच्युअल फंड एसआयपी खात्यांसमवेत गुंतवणूकदार हे मागील नऊ महिन्यांपासून एसआयपीच्या माध्यमातून दर महिन्याला रु. ८,००० कोटींची गुंतवणूक करत आहेत. ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ (अ‍ॅम्फीच्या जुलैमधील) आकडेवारीनुसार असे दिसते की, उद्योगक्षेत्रात आर्थिक वर्ष २०१९-२० च्या पहिल्या तीन महिन्यात दर महिन्याला सरासरी ९.३२ लाख खाती जोडली गेली. ज्यांची सरासरी एसआयपी गुंतवणूक ३,००० पर्यंत होती.

अलीकडे भांडवली बाजारात असलेल्या अस्थिरतेमुळे समभाग बाजाराच्या मासिक गुंतवणुकीत हादरे बसण्याची शक्यता आहे. परंतु एसआयपी गुंतवणुकीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. बाजारात अस्थिरतेचे वातावरण असतानाही एसआयपी गुंतवणुकीस बहार आलेला आहे.  यामुळे केवळ म्युच्युअल फंड गुंतवणुकदारांचा आत्मविश्वास प्रतीत होत नसून हे परिपक्व  वागणुकीचे प्रतिबिंब आहे.

आजच्या काळाला प्रचंड वेग आहे, सुलभ आणि सोपी गुंतवणूक बरीच परिणामकारक ठरते आणि अशा स्थितीत एसआयपीने नव्या दमाच्या गुंतवणुकदारांचे लक्ष वेधले आहे. गुंतवणूकदाराला वित्तीय स्वातंत्र्याच्या दिशेने चालायला एसआयपी सा करते आणि बाजारात शिस्तीने गुंतवणूक करायला शिकवते. बाजाराचा कल कसाही असला तरीही गुंतवणुकीचे हे मार्ग गुंतवणूक करायला भाग पडतात. तर त्याचक्षणी म्युच्युअल फंड योजनांमध्ये मालमत्तेचे विभाजन, कालावधी आणि रकमेत लवचिकता प्रदान करतात.

एसआयपीचा मुद्दा येतो तेव्हा गुंतवणुकीच्या निर्णयात मानसिकदृष्टय़ा पक्षपाती राहाणे टाळावे. बाजारात अनिश्चितता असते  त्यावेळी गुंतवणूकदार त्याच्या दीर्घकालीन गुंतवणुकीच्या उद्देशापासून दूर जाताना दिसतात व अनेकदा एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याचे सोडून देतात. बाजारात मंदी आल्याने गुंतवणूकदार कच खाऊन  एसआयपी थांबविण्याचा विचार करत असेल तर काय म्हणावे? त्यामुळे एसआयपीची नाळ एखाद्या अपेक्षित आर्थिक उद्दिष्टासोबत जोडावी. अशी गुंतवणूक केल्यास नफादेखील कमावता येतो व अल्पकालीन अस्थिरतेकडे दुर्लक्षदेखील करता येते. नजीकच्या काळात नकारात्मक परतावा आणि गुंतवलेले पैसे तोटय़ात जाणे अतिशय निरुत्साही करणारे ठरते. परंतु सातत्याने गुंतवणूक करणे व आपल्या आर्थिक उद्दिष्टांविषयी वचनबद्ध राहणे हीच यशस्वी गुंतवणुकीची गुरुकिल्ली आहे.

भारतामध्ये भौतिक मालमत्तेत गुंतवणूक करण्याची पद्धत बदलली असून आर्थिक गुंतवणूक करण्यावर भर दिला जातो. भारतातील म्युच्युअल फंडातील प्रवेश खालच्या स्तरावर दिसेल. एसआयपीद्वारे थेंबे थेंबे तळे साचवल्यास म्युच्युअल फंड क्षेत्राला वाढीसाठी प्रोत्साहन मिळेल आणि गुंतवणूकदारांसाठी त्यांची आर्थिक उद्दिष्टय़े आणि जोखीम खाती / रिस्क प्रोफाईल्सकरिता समर्पक उत्पादने बाजारात दाखल होतील.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुंतवणूकदारांना संपत्ती निर्मितीसाठी मदत करण्यात म्युच्युअल फंडांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते. फक्त त्यांनी दीर्घकालीन गुंतवणुकीकरिता वचनबद्ध असावे, हीच अपेक्षा!

लेखक ‘अ‍ॅम्फी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.