20 September 2020

News Flash

‘एसआयपी’ला गळती

करोना आणि टाळेबंदीमुळे रोकड गरज म्हणून या पर्यायातून रक्कम काढून घेण्याचे धोरण गुंतवणूकदारांनी अनुसरल्याचे स्पष्ट होते.

(संग्रहित छायाचित्र)

एके काळी गुंतवणूकदारांचा पसंती म्युच्युअल फंड पर्याय असलेल्या ‘एसआयपी’ला लागलेली निधी-गळती सलग पाचव्या महिन्यात कायम राहिली आहे. करोना आणि टाळेबंदीमुळे रोकड गरज म्हणून या पर्यायातून रक्कम काढून घेण्याचे धोरण गुंतवणूकदारांनी अनुसरल्याचे स्पष्ट होते.

म्युच्युअल फंडातील नियोजनबद्ध  व नियतकालिक गुंतवणूक अर्थात ‘एसआयपी’तील ओघ ऑगस्टमध्ये रोडावून ७,७९१ कोटी रुपयांवर आला आहे. सप्टेंबर २०१८ नंतरचा हा किमान स्तर आहे. सरलेल्या जूनमध्ये सर्वप्रमथम या गुंतवणुकीने ८,००० कोटी रुपयांच्या मासिक ओघाचा स्तर सोडला होता.

इक्विटी फंडातील एसआयपीतून ४,००० कोटी रुपये गेल्या महिन्यात काढण्यात आले. जुलैमधील हेच प्रमाण २,४८० कोटी रुपये  होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 12:01 am

Web Title: sip mutual fund leaks abn 97
Next Stories
1 ‘पीएफ’चे व्याज आता दोन हप्त्यात!
2 सेन्सेक्स-निफ्टीत सलग घसरण
3 नफावसुलीने ‘इक्विटी’ म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीला ओहोटी
Just Now!
X