माहिती-तंत्रज्ञानातील जागतिक अग्रणी आयबीएमने सहकारी बँकांनाही त्यांच्या ग्राहकांना मोबाईल बँकिंग, ऑनलाइन बँकिंग अशा आधुनिक सुविधा माफक खर्चात व तत्परतेने उपलब्ध करून देत स्पर्धेत टिकाव धरण्यास मोलाचा मदतीचा हात पुढे केला आहे. आयबीएमच्या प्री-पॅकेज्ड डेटा सेंटरचा वापर महाराष्ट्रातील कराड अर्बन को-ऑप. बँक, लातूर अर्बन को-ऑप. बँक, चिखली अर्बन को-ऑप. बँक, पाँडिचेरी को-ऑप. बँक, सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँक आणि नवनगर सहकारी बँक अशा सहा बँका यशस्वीरित्या करीत असून कार्यक्षमतेत सुधारणेचा त्यांनी प्रत्यय दिला आहे. तर राज्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक लि. सह देशभरातील अन्य तीन बँकांनी आयबीएम डेटा सेंटर उपयोगात आणण्याचे ठरविले आहे.