25 May 2020

News Flash

सिलिकॉन व्हॅलीतील कंपनी‘स्नॅपडील’च्या ताब्यात

ई-व्यापारातील भारताची अग्रणी नवउद्यमी कंपनी स्नॅपडीलने अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीतील रिडय़ूस डाटा ही नवोद्योगी कंपनी ताब्यात घेतल्याची बुधवारी घोषणा केली.

ई-व्यापारातील भारताची अग्रणी नवउद्यमी कंपनी स्नॅपडीलने अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीतील रिडय़ूस डाटा ही नवोद्योगी कंपनी ताब्यात घेतल्याची बुधवारी घोषणा केली.
या व्यवहारासाठी किती मोबदला मोजण्यात आला हे उभयतांकडून जाहीर करण्यात आलेले नाही. पण स्नॅपडीलला या ताबा व्यवहारामुळे फ्लिपकार्ट व अ‍ॅमेझॉन या कंपन्यांशी स्पर्धा करताना अनेकांगाने फायदाच होणार आहे.
माउंट व्ह्य़ू येथील ही कंपनी डिजिटल जाहिरातींचे फार वेगळ्या स्वरूपाचे डिस्प्ले तयार करते. असीफ अली यांनी २०१२ मध्ये ही कंपनी स्थापन केली होती व त्यांचे ग्राहक अमेरिका, भारत व ब्रिटन या देशात आहेत. आमच्या उत्पादनांसाठी व दोन लाख विक्रेत्यांसाठी हा नवा डिजिटल मंच उपयोगी पडेल असे स्नॅपडीलने म्हटले आहे.
स्नॅपडीलचे संस्थापक रोहित बन्सल यांनी सांगितले की, अली यांना वेब तंत्रज्ञानातील १७ वर्षांचा अनुभव आहे. स्नॅपडीलने याच वर्षांत फ्रीचार्ज, मार्टमोबी व लेटसगोमो लॅबस या कंपन्या ताब्यात घेतल्या आहेत. स्नॅपडीलचे ४ कोटी वापरकर्ते असून एकूण दोन लाख विक्रेते आहेत. मोबाईल व साखळी पुरवठा उद्योगातील काही कंपन्या विकत घेण्याचाही स्नॅपडीलचा विचार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2015 8:30 am

Web Title: snapdeal acquires silicon valley based company
टॅग Business News
Next Stories
1 प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याला ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
2 ‘कर-दहशतवाद’ नव्हे, कर प्रशासनातील ‘कुप्रवृत्तीं’ना पायबंद!
3 सेन्सेक्स वर्षांच्या तळात
Just Now!
X