सामाजिक कौशल्ये आणि डिजिटल साक्षरता या नवीन काळातील कर्मचाऱ्यांसाठी असल्याच पाहिजेत; नोकरी क्षेत्रात त्या महत्त्वाच्या ठरतात, असे नव्याने प्रकाशित झालेल्या ‘रँडस्टॅड’ या भारतातील अद्ययावत ‘ग्लोबल वर्कमॉनिटर सव्र्हेक्षण २०१३’ या तिमाही अंकात नमूद करण्यात आले आहे.
नोकरीच्या शोधात असलेल्यांचा आत्मविश्वास आणि नोकरीच्या बाजारपेठेतील एकूण चित्र समजून रोजगार बाजारपेठेतील प्रवाह ३२ देशांमध्ये पाहिले जाणाऱ्या या सर्वेक्षणातून सूचित करण्यात आले आहे की, कर्मचाऱ्यांची सामाजिक कौशल्ये (९१ टक्के), डिजिटल कौशल्ये (९१ टक्के), शिक्षण (९० टक्के) आणि अनुभव (९४ टक्के) या बाबी पाच वर्षांपूर्वीपेक्षा विद्यमान स्थितीत अधिक महत्त्वाच्या ठरल्या आहेत.
सर्वेक्षणाला ९० टक्के प्रतिसाद देणाऱ्यांच्या मते पुढील पाच वर्षांमध्ये त्यांची नोकरीची गरज अधिकच आव्हानात्मक होईल आणि ही जगाच्या सरासरीच्या म्हणजे ७६ टक्क्यांपेक्षा अधिक असेल. याशिवाय, ९० टक्के कर्मचाऱ्यांच्या मते नोकऱ्यांच्या गरजा पुढील ५ वर्षांत जास्त आव्हानात्मक झाल्यामुळे परिस्थिती आणखी कठीण होणार आहे. हे जगाच्या सरासरीच्या म्हणजे ७६ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
सर्वेक्षणातील माहितीबाबत ‘रॅन्डस्टॅड इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मूर्ती के उप्पलुरी म्हणाले की, ‘कॉर्पोरेट भारत जास्त ग्लोबल आणि विविधांगी होत चालला आहे. त्यामुळे उद्योगक्षेत्रातील संस्था विविध भौगोलिक क्षेत्रांतील टॅलेंटना काम देत आहेत. त्यामुळे परिणामकारक सामाजिक कौशल्येि असलेल्या आणि संस्थेच्या संस्कृतीत बसणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपन्या शोधत आहेत. तसेच वितरित मनुष्यबळाला जोडणारे तंत्रज्ञान अत्यावश्यक असल्यिामुळे डिजिटल साक्षरता आणि नेटिकेट हे नोकरी देताना कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक ठरले आहे.’
भारत हा जगासाठी वेगाने मनुष्यबळ पॉवरहाऊस म्हणून विकसित होत आहे. येथे ११ दशलक्ष मनुष्यबळ दरवर्षी रोजगार बाजारपेठेत येऊ लागले आहे. त्यामुळे अत्यंत कठीण स्पध्रेला मार्ग मोकळा झाला असून त्यातून संघटनांकडून उच्च मागणी आणि अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. नोकरीच्या गरजांमध्ये मोठी मागणी असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी स्वतला या परिस्थितीसाठी तयार ठेवावे आणि आवश्यक ती कौशल्येही आत्मसात करावीत.