पर्यावरणस्नेही पाऊल म्हणून इंडियन ऑइलने आपल्या वितरक भागीदारांना सौर ऊर्जेवर आपले पेट्रोल पंप चालविण्यासाठी कायम प्रोत्साहन दिले असून, आजवर महाराष्ट्राच्या ग्रामीण व निमशहरी भागात तब्बल १५० पंप सौर ऊर्जेवर चालत आहेत. पण या आघाडीवर मुंबई शहरातील पहिल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपाचे अलीकडेच उद्घाटन करण्यात आले.
मेसर्स रवी ऑटोमोबाईल्स या पेट्रोल पंपाच्या या २४ किलोव्ॉट क्षमतेच्या सोलर फोटोव्होल्टेक सुविधेचे इंडियन ऑइलचे संचालक (विपणन) यांनी महाव्यवस्थापक बी. के. सिंग आणि राज्यातील अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केले.
विजेच्या खर्चात मोठी बचत करण्याबरोबरच, भारनियमनापासून मुक्तता मिळून विजेचा विनाखंड पुरवठा या सौर यंत्रणेतून मिळविता येतो. शिवाय वीज नसेल तेव्हा जनरेटर संच चालविण्यासाठी वापरात येणाऱ्या डिझेलच्या खर्चातही बचत झाल्याचा कंपनीचा अनुभव आहे.