ओरिफ्लेमचे बॉडी लोशन
ओरिफ्लेमने बॉडी लोशनची शृंखला सादर केली आहे. हॅप्पी स्कीनच्या ब्रीदखाली सादर करण्यात आलेली ही उत्पादने तीन प्रकारात आहेत. त्यांची किंमत प्रत्येकी ४०० मिलीसाठी ४९० रुपये आहे.
इन्डोलाचे केअर कलर
इन्डोला प्रोफेशनल केअर कलरच्या सहकार्याने नवे हेअर केलर भारतीय बाजारपेठेत अवतरले आहेत. काळा ते सोनेरी अशा विविध रंगांमध्ये प्रत्येक छटा ही ६० मिलीच्या टय़ुबमध्ये सादर करण्यात आली आहे.
न्युट्रिलाचे राईट बाईट
न्युट्रिलाने राईट बाईट हा बिस्किट ब्रॅण्ड चोको स्लीम, चोको फज, हनी लेमन चवींमध्ये सादर केला आहे. प्रत्येक बारची किंमत ९० रुपये तर ६ बारच्या एका पॅकची किंमत ४९९ रुपये आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 15, 2013 12:28 pm