30 September 2020

News Flash

वसई-विरार पालघरवासियांना लवकरच पाइपद्वारे गॅस सुविधा

वसई, विरार, पालघर व तारापूर या मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्य़ातील उपनगरांमध्ये राहणाऱ्या १२ लाख कुटुंबांना आता स्वैपाकासाठी घरोघरी पाइप्ड नैसर्गिक वायू (पीएनजी) मिळू शकेल,

| October 1, 2013 12:42 pm

वसई, विरार, पालघर व तारापूर या मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्य़ातील उपनगरांमध्ये राहणाऱ्या १२ लाख कुटुंबांना आता स्वैपाकासाठी घरोघरी पाइप्ड नैसर्गिक वायू (पीएनजी) मिळू शकेल, तसेच वाहनांसाठी सीएनजीदेखील उपलब्ध होईल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियमन मंडळ (पीएनजीआरबी)ने अशा प्रस्तावाला नुकतीच मंजूरी दिली. त्यानंतर २६ सप्टेंबरला जारी करण्यात आलेल्या सूचनेद्वारे मंडळाने पीएनजी आणि सीएनजी ठाणे जिल्ह्य़ातील या शहरांमध्ये पीएनजी आणि सीएनजी गॅस वितरणाच्या जाळ्याच्या विकासाकरिता निविदाही मागविल्या आहेत. स्थानिक खासदार बळीराम जाधव आणि आमदार क्षितिज ठाकूर यांनी पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली आणि पीएनजीआरबीचे अध्यक्ष एस. कृष्णन यांना सादर केलेल्या निवेदनानंतर हा निर्णय घेण्यात आला. या परिसरातील ४०,००० पेक्षा जास्त ऑटोरिक्षा आणि सार्वजनिक परिवहनाकरिता वापरात असलेल्या ४००हून अधिक बसगाडय़ा आता नैसर्गिक वायूचा इंधन म्हणून वापर करू शकतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2013 12:42 pm

Web Title: soon gas pipeline in vasai virar and palghar
Next Stories
1 वस्त्रोद्योगातील तांत्रिकतेचे ‘टेकटेक्स्टाइल’ प्रदर्शन गुरुवारपासून
2 तुटीची डोकेदुखी
3 धास्तावलेल्या सेन्सेक्सला ३४७ अंशांचा खड्डा!
Just Now!
X