देशातील सर्वात मोठय़ा सरकारी बँकेतील संभाव्य विलीनीकरणाला विरोध म्हणून स्टेट बँकेच्या पाच सहयोगी बँकांमधील कर्मचारी गुरुवारी देशव्यापी संप आहे.

स्टेट बँकेच्या स्टेट बँक ऑफ बिकानेर व जयपूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद व स्टेट बँक ऑफ पतियाला या पाच सहयोगी बँका आहेत. या बँकांतील कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारी संघटना ‘स्टेट सेक्टर बँक एम्प्लॉइज असोसिएशन’बरोबरची मंगळवारी दिल्लीच्या मुख्य कामगार आयुक्तांबरोबर झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने गुरुवारचा संप अटळ असल्याचे संघटनेने म्हटले आहे. स्टेट बँक ऑफ इंदूर व स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र या सहयोगी बँकांचे यापूर्वीच स्टेट बँकेत विलीनीकरण झाले आहे.
उर्वरित पाच सहयोगी बँकांच्या मुख्य बँकेतील विलीनीकरणाला विरोधासह अन्य मागण्यांसठी ‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन’ने येत्या २४ जून रोजी सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांना संपाची हाक दिली आहे.