08 August 2020

News Flash

स्टेट बँकेचा बचत खाते व्याजदर घटून ३.२५ टक्क्यांवर

बँकेने सहाव्यांदा कर्ज व्याजदर कमी केले असून एप्रिलनंतरची ही सर्वात मोठी दर कपात ठरली आहे

संग्रहित छायाचित्र

कर्जाच्या व्याजदरातही  सहाव्यांदा घट

मुंबई : ऐन सण-समारंभात पतपुरवठा मागणीला चालना देण्यासाठी स्टेट बँकेने सलग सहाव्यांदा कर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. देशातील सर्वात मोठय़ा बँकेने तिचे कर्ज व्याजदर ०.१० टक्क्याने कमी केले आहेत. तर बचत खात्यावरील व्याजही तुलनेत अधिक, ०.२५ टक्के प्रमाणात कमी केले आहेत.

स्टेट बँकेने ‘एमसीएलआर’मध्ये सुधार करताना त्यात सर्व कालावधीसाठीचा दर ०.१० टक्क्याने कमी करत तो वार्षिक ८.०५ टक्के केला आहे. बँकेच्या एक लाख रुपयेपर्यंतच्या बचत खात्यावरील व्याजदर सध्याच्या ३.५० टक्क्यांवरून ३.२५ टक्के करण्यात आला आहे.

बँकेने सहाव्यांदा कर्ज व्याजदर कमी केले असून एप्रिलनंतरची ही सर्वात मोठी दर कपात ठरली आहे. कर्जावरील नवा व्याजदर गुरुवारपासून तर ठेवींवरील सुधारित व्याजदर येत्या १ नोव्हेंबरपासून अमलात येणार आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या गेल्या आठवडय़ातील पाव टक्के रेपो दर कपातीनंतर व्याजदर कमी करणाऱ्या निवडक बँकेमध्ये स्टेट बँकही समाविष्ट आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दर ५.१५ टक्के करताना गेल्या दशकातील किमान स्तरावर आणून ठेवला.

सण-समारंभातही ग्राहकांकडून पतपुरवठय़ाला प्रतिसाद मिळत नसल्याने व्यापारी बँकांना केंद्र सरकारने यापूर्वीच कर्ज मेळावे घेण्यास सांगितले आहेत. बँकांकडून चालू महिन्यात ते दोन टप्प्यात देशाच्या विविध जिल्ह्य़ांमध्ये होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 3:51 am

Web Title: state bank of india cuts interest rates on savings accounts zws 70
Next Stories
1 समभागसंलग्न म्युच्युअल फंडात नफावसुली; सप्टेंबरमधील ओघ चार महिन्यांच्या नीचांकी
2 अर्थमंत्र्यांची सोमवारी बँकप्रमुखांशी चर्चा
3 ‘सेन्सेक्स’ची ६४६ अंशांनी झेप
Just Now!
X