21 July 2019

News Flash

खुशखबर: SBI ने केले व्याजदर कमी

आजपासून हे नवे दर लागू होणार असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे.

संग्रहित छायाचित्र

रिझर्व्ह बँकेने नुकतेच रेपो दरांमध्ये कपात केली आहे. त्यानंतर त्याचा फायदा सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी केले होते. आता, देशातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बँकेने कर्जाच्या व्याजदरात 0.05 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

आजपासून (बुधवार) हे नवे दर लागू होणार असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे. सुरू आर्थिक वर्षात स्टेट बँकेने तिसऱ्यांदा कर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. यापूर्वी बँकेने एप्रिल आणि मे महिन्यात 0.05-0.05 टक्क्यांची कपात केली होती. तसेच यादरम्यान, आतापर्यंत बँकेने गृह कर्जावरील व्याज दरातही 0.20 कपात केली आहे. दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्पानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर दास यांनी रेपो दरात केलेल्या कपातीचा लाभ सामान्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यात यावा, असे आवाहन केले होते.

जून महिन्यात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात केली होती. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, कॉर्पोरेशन बँक, ओरिएंटल बँक आणि आयडीबीआय बँकेने आपल्या एमसीएलआर दरात 0.05 ते 0.10 टक्क्यांची कपात केली होती. रिझर्व्ह बँकेची पुढील बैठक आता 5 ते 8 ऑगस्टदरम्यान होणार आहे. 1 जुलै रोजी आयसीआयसीआय बँकेने एमसीएलआरच्या दरात 0.10 टक्क्यांची कपात केली होती. बँकेचा एका वर्षासाठीचा एमसीएलआर दर 8.65 टक्के आहे. तसेच यापूर्वी आयडीबीआय बँकेनेही आपल्या एमसीएलआरच्या दरात 0.005 चे 0.10 टक्कयांची कपात केली होती.

First Published on July 10, 2019 2:32 pm

Web Title: state bank of india reduces interest rates on loan jud 87