सुमारे ७००० कोटी रुपयांच्या कर्जथकीताच्या प्रकरणात मुख्य प्रवर्तक विजय मल्ल्या यांच्या ‘किंगफिशर हाऊस’ या सुमारे १०० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर स्टेट बँकेने ताबा मिळविला आहे. विलेपार्ले (पूर्व) येथील १७,००० चौरस फूटची ही इमारत म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून जमिनीवर असलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचे मुख्यालय आहे. स्टेट बँकेसह विविध १७ बँकांचे ६,८०० कोटी रुपयांचे कर्ज थकविले प्रकरणात अखेर ही मालमत्ता एसबीआय कॅपला हस्तांतरित करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ही इमारत नजीक आहे.