05 April 2020

News Flash

राज्य कर्मचारी विमा योजना सदस्य संख्येत जानेवारीत वाढ

जानेवारी २०२० मध्ये १२.०६ लाख नवीन सदस्यांची नोंदणी

संग्रहित छायाचित्र

राज्य कर्मचारी विमा योजनेच्या सदस्य संख्येत जानेवारी २०२० मध्ये १२.०६ लाख नवीन सदस्यांची नोंदणी झाली आहे.

राज्य कर्मचारी विमा योजनेच्या सदस्य संख्येत डिसेंबर महिन्यात १२.९० लाख कर्मचारी नव्याने दाखल झाले होते. २०१८-१९ मध्ये राज्य कर्मचारी विमा योजनेच्या सदस्य संख्या १.४९ कोटी सदस्यांची नव्याने नोंदणी झाली असल्याची माहिती राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात दिली आहे. ‘पेरोल रिपोर्टिंग इन इंडिया : एम्प्लॉयमेंट पस्र्पेक्टिव्ह – जानेवारी २०२०’ या अहवालात दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर २०१७ ते जानेवारी २०१९ दरम्यान ३.६२ कोटी सदस्यांची नव्याने नोंदणी झाली. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचा हा अहवाल ईएसआयसी, सेवानिवृत्ती निधी संस्था आणि पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) द्वारा संकलित विविध सामाजिक सुरक्षा योजनांच्या नवीन ग्राहकांच्या वेतनपट आधार बिंदूंवर आधारित आहे. या प्रकारचा अहवाल नव्याने रोजगार मिळालेल्यांचा अभ्यास करण्यासाठी सप्टेंबर २०१७ पासून दरमहा प्रसिद्ध केला जातो. या अहवालानुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (ईपीएफओ) जानेवारीत १०.४५ लाख नवीन सदस्य नोंदविण्यात आले. डिसेंबर २०१९ मध्ये नव्याने नोंद झालेल्या सदस्यांची संख्या ९.१२ लाख होती.  या आर्थिक वर्षांत वर्षी एप्रिल ते जानेवारी या कालावधीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने चालविलेल्या सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये ६९.३५ लाख नवीन सदस्य सामील झाले असून मागील संपूर्ण आर्थिक वर्षांत नव्याने दाखल झालेल्या ६१.१२ लाखांच्या संख्येपेक्षा अधिक आहेत, असे अहवालात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 12:26 am

Web Title: state employee insurance plans increase in january abn 97
Next Stories
1 शेअर बाजार सावरला, सेन्सेक्समध्ये १८०० पेक्षा जास्त अंकांची वाढ
2 निर्देशांक घसरणीला चाप
3 आर्थिक वर्ष पुढे ढकलले का? राज्य सरकारच्या पत्रकात झाला हा खुलासा
Just Now!
X