05 April 2020

News Flash

सेन्सेक्सची साप्ताहिक घसरणीची हॅट्ट्रिक

किरकोळ अंशांची घसरण नोंदवत मुंबई शेअर बाजाराने शुक्रवारी तिसरी सप्ताह घट राखली. सलग तिसऱ्या सत्रात नकारात्मक प्रवास करताना सेन्सेक्स सप्ताहअखेर ११.६६ अंश घसरणीसह २०,२१७.३९ वर

| November 23, 2013 12:24 pm

किरकोळ अंशांची घसरण नोंदवत मुंबई शेअर बाजाराने शुक्रवारी तिसरी सप्ताह घट राखली. सलग तिसऱ्या सत्रात नकारात्मक प्रवास करताना सेन्सेक्स सप्ताहअखेर ११.६६ अंश घसरणीसह २०,२१७.३९ वर येऊन ठेपला. सेन्सेक्स आता आठवडय़ाच्या नीचांक टप्प्यावर आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतदेखील आठवडाअखेरच्या व्यवहारात ३.६० अंश घसरणीसह ५,९९५.४५ पर्यंत खाली आला.
गेल्या दोन व्यवहारांत मोठय़ा घसरणीसह सेन्सेक्स एकूण ६६१.७७ अंशाने कोसळला आहे. गुरुवारच्या व्यवहारात तर त्यात ४००हून अधिक अंशांची आपटी येत सेन्सेक्स जवळपास तीन महिन्यांतील मोठी घसरण नोंदविता झाला होता. शुक्रवारच्या व्यवहारातही सेन्सेक्स १५० अंशांनी खाली आल्यानंतर दिवसअखेर काहीसा सावरत मात्र घसरणीसहच बंद झाला.
दरम्यान, परकी चलन व्यवहारात रुपया शुक्रवारी सलग दोन दिवसांच्या घसरणीतून सावरला. डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन सप्ताहअखेर ६ पैशांनी वधारत ६२.८७ पर्यंत उंचावले. गेल्या सलग दोन दिवसांत घसरणाऱ्या रुपयाने या कालावधीत ५७ पैशांची आपटी खाल्ली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2013 12:24 pm

Web Title: stock market bse sensex posts 3rd weekly loss on uncertainty over us fed tapering
Next Stories
1 भारतीय मळ्यातील कॉफीचा दरवळ ‘स्टारबक्स’च्या माध्यमातून जगभरात
2 भारताबाहेर जाण्यास रॉय यांना मनाई
3 ‘सेन्सेक्स’ची ‘फेड’ आपटी!
Just Now!
X