News Flash

भांडवली बाजार आणखी तळात ; सेन्सेक्स, निफ्टीची तीन वर्षांतील मोठी पडझड

भारतावरील करोना विषाणूचे संकट कायम असल्याची प्रतिक्रिया भांडवली बाजारात पुन्हा बुधवारी उमटली.

मुंबई : भांडवली बाजारातील मोठी निर्देशांक पडझड आठवडय़ाच्या तिसऱ्या सत्रातही कायम राहिली. बुधवारी तर सेन्सेक्सने एकाच सत्रात १,७०९.५८ अंशांची आपटी नोंदविताना त्याचा २९ हजाराचा स्तरही सोडला. मुंबई निर्देशांक अखेर २८,८६९.५१ वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांक व्यवहारात ५०० अंश घसरणीने ८,५०० च्याही खाली आला. निफ्टी सत्रअखेर ४९८.२५ अंश नुकसानासह ८,४६८ पर्यंत थांबला.

भारतावरील करोना विषाणूचे संकट कायम असल्याची प्रतिक्रिया भांडवली बाजारात पुन्हा बुधवारी उमटली. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या थकीत रकमेबाबतच्या पुनर्निणयाने भांडवली बाजारात सूचिबद्ध दूरसंचार कंपन्या तसेच बँक समभागांवर विक्री दबाव वाढला. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल गेल्या सलग तीन व्यवहारातील घसरणीने १५.७२ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे.

ब्रिटिश पौंडाचे चिंताजनक अवमूल्यन

लंडन: करोना विषाणू बळीबाबत आशियाला मागे टाकणाऱ्या युरोपच्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता निर्माण झाली असून त्याचे पडसाद ब्रिटिश पौंडवर बुधवारी तीव्रतेने उमटले. डॉलरच्या तुलनेत युरोपातील महत्त्वाच्या ब्रिटनचे स्थानिक चलन १९८० नंतरच्या तळात पोहोचले आहे. डॉलरसमोर पौंड बुधवारी आंतरराष्ट्रीय परकीय चलन विनिमय मंचावर १.१८ डॉलर राहिले. ८० च्या दशकात ते १.२० डॉलर होते. सत्रात पौंड १.१७ डॉलपर्यंत घसरले होते. युरोपीय अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी चान्सलर रिषी सुनाक यांनी ३५० अब्ज पौंडांचे अर्थसहाय्य जाहीर करूनही स्थानिक चलन सावरू शकले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 3:57 am

Web Title: stock market crash sensex falls over 1700 points zws 70
Next Stories
1 ‘एमटीएनएल’ची बँक ऑफ इंडियाकडून कर्जउचल!
2 येस बँकेला निर्बंधातून मुक्ती, खातेधारकांना ५० हजारापेक्षा जास्त रक्कम काढता येणार
3 शेअर बाजार गडगडला, आजही सेन्सेक्स, निफ्टीमध्ये मोठी घसरण
Just Now!
X