26 November 2020

News Flash

सप्ताहअखेर तेजीत

दोन्ही निर्देशांक प्रत्येकी ०.६५ टक्क्यांहून अधिक वाढले.

(संग्रहित छायाचित्र)

भांडवली बाजाराने सप्ताहअखेर मात्र तेजी नोंदविली. बँक, वित्त क्षेत्रातील समभागांच्या गुंतवणूकदारांच्या खरेदीच्या जोरावर सेन्सेक्समध्ये जवळपास ३०० अंश तर निफ्टीत शतकी अंश भर पडली. दोन्ही निर्देशांक प्रत्येकी ०.६५ टक्क्यांहून अधिक वाढले.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २८२.२९ अंश वाढीसह ४३,८८२.२५ वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८७.३५ अंश वाढीने १२,८५९.०५ पर्यंत स्थिरावला. जागतिक बाजारातही विक्रीचे वातावरण होते. आठवडय़ात प्रमुख निर्देशांक एक टक्क्याने वाढले आहेत. सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्स सर्वाधिक, बजाज फिनसव्‍‌र्ह ९ टक्क्यांसह वाढला.

बजाज फायनान्स, टायटन कंपनी, कोटक महिंद्र बँक, भारती एअरटेल, नेस्ले इंडिया, एनटीपीसीही वाढले. तर रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक, सन फार्मा, अ‍ॅक्सिस बँक, ओएनजीसी, हिंदुस्थान यूनिलिव्हरमध्ये घसरण झाली.

ग्लॅन्ड फार्माचे दमदार पदार्पण

ग्लॅन्ड फार्माचे भांडवली बाजारात शुक्रवारी दमदार पदार्पण झाले. समभाग जारी करण्याच्या प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशीच्या व्यवहारात कंपनी समभागात जाहीर किंमतीपेक्षा २१ टक्के अधिक भर पडली. समभाग किंमतपट्टा १,४९० ते १,५०० रुपये असताना सत्रप्रारंभाला मुंबई शेअर बाजारात तो थेट १,७०१ रुपयांवर होता. व्यवहारात तो १,८५० रुपये तर बंदसमयी त्यात ७ टक्के वाढ नोंदली गेली. १,२५० कोटी रुपयांच्या प्रारंभिक खुल्या भागविक्रीसाठी कंपनीने ३.४८ कोटी समभाग उपलब्ध करून दिले आहेत.

रुपया भक्कम

परकीय चलन विनिमय मंचावरही सप्ताहअखेर तेजी नोंदली गेली. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य शुक्रवारी वाढले. ११ पैशांची भर नोंदवीत स्थानिक चलन ७४.१६ पर्यंत उंचावले. व्यवहारात ७४.०९ पर्यंत वाढणाऱ्या रुपयाने व्यवहारात ७४.२१ चा सत्रतळही अनुभवला. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती वाढून प्रतिपिंप ४४ डॉलरच्या पुढे गेल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 12:12 am

Web Title: stock market rallied over the weekend abn 97
Next Stories
1 बाजार-साप्ताहिकी : कसोटीचा काळ
2 अर्थवृद्धी अंदाजात सुधार
3 सेन्सेक्स, निफ्टीत घसरण
Just Now!
X