News Flash

वाहन विक्रीत दमदार वाढ

मार्चमध्ये मारुती, महिंद्र, ह््युंदाई यांची सरस कामगिरी

(संग्रहित छायाचित्र)

आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या शेवटच्या महिन्यात देशातील वाहन कंपन्यांनी लक्षणीय विक्रीवाढ नोंदवली आहे. करोना साथप्रसार आणि अंशत: टाळेबंदीमुळे व्यक्तिगत वाहन खरेदी करण्याकडे वाढलेला कल मार्चमधील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

मार्च २०२०च्या ७६,९७६ वाहनांच्या तुलनेत यंदाच्या मार्चमध्ये मारुती सुझुकीने १,४९,५१८ वाहन विक्री नोंदवली आहे. मारुतीला वर्षभरापूर्वी वाहन विक्रीतील तब्बल ४८ टक्के घसरणीला सामोरे जावे लागले होते. कंपनीने गेल्या एकूण वित्त वर्षात देशांतर्गत बाजारपेठेत १३.२३ लाख वाहने विकली आहेत.

ह््युंदाई मोटर इंडियाच्या मार्च २०२१ मधील वाहन विक्रीत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात कंपनीने ५२,६०० वाहने विकली. कंपनीच्या क्रेटा तसेच आय२०च्या नव्या अवताराला खरेदीदारांकडून लक्षणीय प्रतिसाद मिळाला आहे.

मार्चमध्ये देशांतर्गत बाजारपेठेत महिंद्र अँड महिंद्रच्या १६,७०० वाहनांची विक्री झाली. तर कंपनीने ३,३८३ वाहनांची निर्यात केली. होंडा कार्सच्या विक्रीत यंदा दुप्पट वाढ झाली असून तिने ७ हजारांहून अधिक वाहने विकली. टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीने गेल्या महिन्यात १५,००१ प्रवासी वाहने विकली. २०१३ नंतर कंपनीने मार्चमध्ये केलेली लक्षणीय कामगिरी आहे. गेल्या महिन्यात कंपनीच्या दक्षिण भारतातील वाहन प्रकल्पातील कर्मचारी आंदोलनानंतरही विक्री यंदा वाढली आहे.

टाटा मोटर्सकडून पाचपटीने वाढ

टाटा मोटर्सची वाहन विक्री मार्च २०२० मधील ५,६७६ वरून मार्च २०२१ मध्ये थेट २९,६५४ पर्यंत झेपावली आहे. कंपनीच्या प्रवासी वाहनांना मिळालेली ही पसंती तब्बल पाच पटींनी वाढ दर्शविणारी  आहे. कंपनीने २०२०-२१ वित्त वर्षात २.२२ लाख प्रवासी वाहनांसह ६९ टक्के वाढ नोंदवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2021 12:09 am

Web Title: strong growth in vehicle sales abn 97
Next Stories
1 कामगार वेतन संहिता लांबणीवर
2 वित्त वर्षात निर्देशांकांत ७० टक्के भर
3 किमान ७.५ ते कमाल १२.५ टक्क्यांदरम्यान अर्थवृद्धी
Just Now!
X