News Flash

ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून

यंदा मोठय़ा प्रमाणात ऊस उपलब्ध होणार असल्याने १५ ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय गुरूवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.

| August 2, 2014 02:58 am

यंदा मोठय़ा प्रमाणात ऊस उपलब्ध होणार असल्याने १५ ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय गुरूवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच दरवर्षी ४० लाख  मेट्रिक टन साखरेच्या निर्यातीचा निर्णय कायम ठेवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.  चालू गळीत हंगामाचे धोरण ठरविण्यासाठी गुरुवारी ही बैठक झाली. यंदा ७७० लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप होण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी गाळप हंगाम १ नोव्हेंबरला सुरू करण्यात आला होता. मात्र यंदा तो पंधरा दिवस अगोदर सुरू करण्यात येणार आहे. ज्या साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीच्या गळीत हंगामाचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. रंगनाथन समितीने सुचविल्याप्रमाणे ऊस उत्पादकांना ७० टक्के व व्यवस्थापनासाठी ३० टक्के हा फॉम्र्युला वापरात आणला जाणार आहे. त्यानुसार दर ठरविण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेली समिती ऊस दराचा निर्णय घेईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2014 2:58 am

Web Title: sugarcane crushing season to begin from october 15
Next Stories
1 संपूर्ण आर्थिक समावेशकता
2 ‘पॅनकार्ड क्लब’वर सेबीचे र्निबध
3 विदेशी गुंतवणुकीचा ओघ आटला; सेन्सेक्स २६ हजारांखाली
Just Now!
X