News Flash

भांडवली बाजारात गुंतवणूकदारांची नफेखोरी

गेल्या आठवडय़ात सेन्सेक्स तसेच निफ्टीने काही व्यवहारात सत्रगणिक विक्रमी टप्पे मागे टाकले होते.

सेन्सेक्ससह निफ्टी निर्देशांकांत सप्ताहारंभी घसरण; गुंतवणूकदारांचा विक्री दबाव

मुंबई : ऐतिहासिक टप्प्यानजीक असलेल्या प्रमुख निर्देशांकांचा लाभ पदरात पाडून घेताना गुंतवणूकदारांनी सप्ताहारंभीच नफेखोरी साधली. परिणामी सेन्सेक्स तसेच निफ्टीने सोमवारी एकाच व्यवहारात एक टक्क्य़ापर्यंतची आपटी नोंदविली. व्यवहारात वरच्या टप्प्यावर पोहोचलेल्या निर्देशांकांवर घसरणीसह व्यवहारअखेर विक्री दबाव नोंदला गेला.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी गेल्या सप्ताहअखेरच्या तुलनेत ४१६.४६ अंश घसरणीसह ४१,५२८.९१ वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक १२७.८० अंश घसरणीसह १२,२२४.५५ पर्यंत खाली आला. सत्रात सेन्सेक्सने ४२,२७३.८७ अंश तर निफ्टीने १२,४३०.५० अंशपर्यंत मजल मारली. गेल्या आठवडय़ात सेन्सेक्स तसेच निफ्टीने काही व्यवहारात सत्रगणिक विक्रमी टप्पे मागे टाकले होते. तर सप्ताहअखेरही दोन्ही प्रमुख निर्देशांक वरच्या टप्प्यावरच होते. भांडवली बाजाराची नव्या सप्ताहाची सुरुवातही तेजीसह झाली. परिणामी सेन्सेक्स व निफ्टी सोमवारच्या सत्रात त्यांच्या यापूर्वीच्या बंद टप्प्यापुढे व्यवहार करत होते.

सेन्सेक्समधील रिलायन्स इंडस्ट्रिज, एचडीएफसी बँक, टीसीएस ३ टक्क्य़ांपर्यंत घसरले. कोटक महिंद्र बँकेतील समभाग आपटी तब्बल ५ टक्क्य़ांपर्यंत राहिली. पॉवरग्रिड, भारती एअरटेल, आयटीसी, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो आदी ३.७५ टक्क्य़ांपर्यंत वाढले. भांडवली बाजार गेल्या सप्ताहात कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाहीत वित्तीय निष्कर्षांवर प्रतिक्रिया देत होता. आता मात्र बाजारात कंपन्या, बँक, वित्तीय संस्थांकडून स्पष्ट होणाऱ्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसात जाहीर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत अपेक्षाही वर्तविली जात आहे.

मुंबई शेअर बाजारात क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ऊर्जा, बँक, तेल व वायू, वित्त, पोलाद, माहिती तंत्रज्ञान, वाहन आदी निर्देशांक २.६७ टक्क्य़ांपर्यंत घसरले. दूरसंचार, स्थावर मालमत्ता निर्देशांकात जवळपास २ टक्क्य़ांपर्यंत वाढ राहिली. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक अर्ध्या  टक्क्य़ापर्यंत घसरले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 1:15 am

Web Title: sunesex nefity index investor sales pressure akp 94
Next Stories
1 अ‍ॅमेझॉन इंडियाचे १०,००० इलेक्ट्रिक वाहनांचे लक्ष्य
2 रिलायन्स, टीसीएसकडून हिरमोड
3 दहा लाख रोजगार निर्माणाचे ‘अ‍ॅमेझॉन’चे लक्ष्य
Just Now!
X