देशातील उद्योगांची संघटना असलेल्या भारतीय औद्योगिक महासंघ अर्थात ‘सीआयआय’च्या महाराष्ट्र परिषदेवर सुनिल खन्ना यांची निवड झाली आहे.
एमरसन नेटवर्क पॉवर (इंडिया)चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असलेल्या खन्ना यांची ही नियुक्ती २०१६-१७ करिता असेल. याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून ओएमआर बागला ऑटोमोटिव्ह सिस्टिम्स इंडियाचे संचालक रिषी कुमार बागला हे नियुक्त झाले आहेत.
महासंघाच्या महाराष्ट्र परिषदेने नव्या आर्थिक वर्षांसाठी ‘महाराष्ट्र उभारणी : नाविन्य व गुंतवणूक’ या उद्दीष्टावर कार्य करण्याचे निश्चित केले आहे.