28 November 2020

News Flash

विदेशातून कर्ज उभारणीला ‘सहारा’ला परवानगी

गेल्या जवळपास वर्षभरापासून तुरुंगात असलेल्या सहाराश्री सुब्रतो राय यांच्या जामिनाच्या रकमेसाठी विदेशातून कर्ज घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहारा समूहाला शुक्रवारी परवानगी दिली.

| January 10, 2015 01:26 am

सुब्रतो रॉय (संग्रहित छायाचित्र)

गेल्या जवळपास वर्षभरापासून तुरुंगात असलेल्या सहाराश्री सुब्रतो राय यांच्या जामिनाच्या रकमेसाठी विदेशातून कर्ज घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहारा समूहाला शुक्रवारी परवानगी दिली.
सहारा समूहाने न्यायालयाकडे विदेशात कर्ज व्यवहार करण्यास परवानगी मागितली होती. त्याला होकार देतानाच याबाबत रिझव्र्ह बँकेलाही सर्व सूचना  व तपशील द्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सहारा समूहाला दिले.
विदेशातून पैसा जमविल्यावर तो भारतात आणण्यासाठी रिझव्र्ह बँकेची परवानगी आवश्यक ठरेल. याचबरोबर न्यायालयाने रॉय यांना हॉटेल मालमत्ता विक्रीच्या व्यवहारासाठी आणि खरेदीदारांशी वाटाघाटीसाठी तिहार तुरुंगात पुरविलेली अद्ययावत सुविधा आणखी काही दिवस सुरू ठेवण्याची तयारी न्यायालयाने दर्शविली.
सहारा समूहाच्या विदेशातील मालमत्ता विकण्यासाठी तुरुंगाच्या आवारातून स्वत: राय यांना व्यवहार करता यावेत, यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे. एका विशेष दालनात फोन, कॉम्प्युटर, कॅमेरा आदी साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तथापि रॉय यांच्या सोबतीसाठी निवडक व्यक्तींनाच प्रवेश लागू केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 1:26 am

Web Title: supreme court allows sahara to raise loan for subrata roys bail
टॅग Sahara,Supreme Court
Next Stories
1 बँकांच्या स्वायत्ततेच्या मोदी यांच्या विधानाचे रघुराम राजन यांच्याकडून कौतुक!
2 बदलापूर-अंबरनाथमधील ‘बजेट’ घरांचे प्रदर्शन
3 कृष्णा बिश्त यांना जानकीदेवी बजाज पुरस्कार प्रदान
Just Now!
X