News Flash

टाळेबंदी, निर्बंधांमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा!

पर्यटन व्यावसायिकांचे राज्यात सर्वेक्षण

पर्यटन व्यावसायिकांचे राज्यात सर्वेक्षण

पुणे : टाळेबंदी, संचारबंदी आणि निर्बंधांमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमटीडीसी) आणि पर्यटन संचालनालयाकडून ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

पर्यटनस्थळी असलेल्या शहरी आणि ग्रामीण भागातील बाजारपेठाही ओस पडल्या आहेत. परिणामी दीड ते दोन हजार कोटींची उलाढाल थंडावली आहे.

या पार्श्वभूमीवर पर्यटन, आदरातिथ्य क्षेत्रातील सर्व घटकांकडून या सर्वेक्षणांतर्गत माहिती मागवण्यात येत आहे. त्यामधून हाती आलेल्या विदानुसार (डाटा) आगामी काळात राज्याचे आदरातिथ्यविषयक धोरण ठरवण्यात येणार आहे.

करोनामुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदी, संचारबंदी आणि निर्बंधांमुळे गेल्यावर्षीपासून राज्यातील दरमहा होणारी दीड ते दोन हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली.

पर्यटन व्यवसाय सावरण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबवता येतील, नुकसान भरून काढण्यासाठी काय करावे लागेल? आगामी काळातील पर्यटन धोरण कसे असेल? याकरिता या सर्वेक्षणातून मिळणारा विदा महत्त्वाचा ठरणार आहे.

याबाबत पर्यटन संचालनालय पुणे विभागाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर – दातार म्हणाल्या, ‘वर्षभर पर्यटनासाठीची विमानसेवा बंद असल्याने विदेशी पर्यटक आलेले नाहीत. रेल्वे बंदमुळे देशांतर्गत पर्यटन आणि त्यावर आधारित व्यापार ठप्प आहे. स्थानिक पातळीवरील टाळेबंदीमुळे प्रवासी वाहतूक थांबली आहे. त्यामुळे लॉजिंग, रेस्टॉरंट, प्रेक्षणीय स्थळांकडे पर्यटक फिरकलेच नाहीत. पर्यटनस्थळी असलेल्या शहरी आणि ग्रामीण भागातील बाजारपेठाही ओस पडल्या आहेत. परिणामी दीड ते दोन हजार कोटींची उलाढाल थंडावली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण घेण्यात येत असून त्यामध्ये हॉटेल व्यावसायिक, रेस्टॉरंट, यात्री निवास, निवास, न्याहारी योजना, कृषी आणि निसर्ग पर्यटन के ंद्र, वॉटर पार्क, टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कं पन्यांचे मध्यस्थ, वाहतूकदार कं पन्या, बोटिंग क्लब, पर्यटन खेळ सुविधा पुरवठादार, गाइड, स्टॉल्सधारक हे प्रमुख घटक के ंद्रस्थानी आहेत.’

सर्वेक्षणासाठी दुवा उपलब्ध

पर्यटक, त्यावर अवलंबून व्यवसाय, पर्यटकांची वार्षिक संख्या, त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, त्यासाठीचे मनुष्यबळ, नुकसानीचे स्वरुप, कामगार संख्या आणि अवलंबत्व असलेले घटक यांना अनुसरून या सर्वेक्षणात प्रश्नावली आहे. या सर्वेक्षणासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScZgZy3jnWplAiZgjkB1DKy9LtJfczhAbEAQ2OmkV-C7h96eQ/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0 हा दुवा उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती एमटीडीसी पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 2:16 am

Web Title: survey of tourism professionals on loss due to lockdown restrictions in maharashtra zws 70
Next Stories
1 महाराष्ट्र आघाडीवर
2 देशातील निर्मिती आठ महिन्यांच्या तळात
3 देशात ७५ लाख बेरोजगार
Just Now!
X